टुडे ४ सेकंड मेन
--
NSK26H33667
जळगाव : महापौर दीपमाला काळे शहरातील स्वच्छतेच्या सूचना आरोग्य विभाग व सफाई मक्तेदारांच्या प्रतिनिधीला देताना.
.....
कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई
महापौर दीपमाला काळे : ‘बीव्हीजी’ला दुप्पट क्षमतेची वाहने देण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानां’तर्गत पहिल्या टप्प्यातील पाच प्रभागांच्या पाहणीनंतर आयोजित आढावा बैठकीत त्यांनी स्वच्छता निरीक्षकांसह बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सूचना केल्या. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत स्वच्छता, बांधकाम, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने आपल्या प्रभागातील समस्यांची नोंद घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून प्रभाग स्वच्छ व आदर्श बनवावेत, असे निर्देश महापौरांनी दिले. तक्रार सोडविल्यानंतर संबंधित नागरिकाची स्वाक्षरी दैनंदिन नोंदवहीत घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बैठकीत कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वाहने तातडीने दुरुस्त करा
कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने उपलब्ध होत नसल्याची बाब बैठकीत समोर आली. यावर महापौरांनी बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक वाहने तातडीने उपलब्ध करण्यास सांगितले. जुन्या व नादुरुस्त वाहनांऐवजी नवीन वाहने देण्यासह गरजेनुसार दुप्पट क्षमतेची वाहने तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कचरा वेळेत उचलला जावा आणि साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यास सांगितले.
नाले, धोकादायक इमारतींची सर्वेक्षण
ममुराबाद रस्ता व पिंप्राळा परिसरातील खुली शौचालये हटविण्याचे, आसोदा रस्त्यावरील पुलाजवळील शौचालयाची स्वच्छता करण्याचे आणि गोपाळपुरा नाल्याची तातडीने सफाई करण्याचे आदेश देण्यात आले. जुन्या व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
कोट
मध्यतंरीच्या काळात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतू आता आरोग्य विभाग व बीव्हीजी कंपनीची बैठक घेवून त्यांना दिवाळीपूर्वी जळगाव शहर स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना स्वच्छ परिसर उपलब्ध करून द्यावा.
- दीपमाला काळे, महापौर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.