नाशिक

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीचा महापूर

CD
टुडे एक मेन फिचर ---- NSK26H34705 (हा फोटो चा कॉलम वापरावा) जळगाव : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी. (छायाचित्रे : संधिपाल वानखेडे) NSK26H34704 झेंडूची फुले विक्री करताना. ----------- लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीचा महापूर सुवर्ण, कापड, इलेक्ट्रॉनिक्ससह पूजासाहित्याच्या दुकानांत झुंबड; मुख्य रस्त्यांवर कोंडी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : दिवाळीच्या प्रकाशपर्वाने शहरातील वातावरण चैतन्यमय झाले असून, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी जळगावच्या बाजारपेठेत अक्षरशः जनसागर उसळला. शनिवारची सुटी आणि सणाचा उत्साह यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची रीघ लागली होती. दुपारनंतर गर्दीचा ओघ अधिकच वाढला आणि रात्रीपर्यंत प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या. सुवर्ण बाजार, कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स दालने, मोबाईल दुकाने आणि पूजासाहित्य विक्रेत्यांकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुसरीकडे, वाढत्या गर्दीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. दिवाळीच्या उत्सवाला गुरुवारी (ता. ५) वसुबारसपासून सुरुवात झाली. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसह विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू, कपडे, सजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्य खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनीही दुकाने आकर्षक पद्धतीने सजविली असून, विविध सवलती आणि योजनांमुळे ग्राहकांचा उत्साह अधिक वाढला आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. कापड बाजारात उत्साह फुले मार्केटसह शहरातील विविध कापड बाजारांत सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठीच्या नवीन फॅशनमधील कपड्यांना विशेष मागणी दिसून आली. साड्यांची दुकाने, रेडिमेड कपड्यांचे दालन आणि बूट-चप्पल विक्रेत्यांकडेही ग्राहकांची मोठी वर्दळ होती. दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबासह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले होते. मोबाईल खरेदीला पसंती दिवाळीत घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल दिसून आला. एलईडी टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टिम अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दालनांमध्ये गर्दी केली. दुकानदारांकडून सुलभ हप्ते, विशेष सवलती आणि खरेदीवर भेटवस्तू अशा योजना दिल्या जात आहेत. गोलाणी मार्केटमध्ये नवीन मोबाईल खरेदीसाठी तरुणांसह अन्य ग्राहकांचीही गर्दी होती. पूजासाहित्य, फुलांना मागणी सुभाष चौक ते बळीराम पेठ आणि फुले मार्केट परिसरात पूजासाहित्याची दुकाने सजली होती. केरसुणी, लक्ष्मीमूर्ती, लाह्या, बत्ताशे, पणत्या आणि रांगोळ्यांच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. दरम्यान, झेंडूच्या फुलांची आवक झाल्याने बाजारात फुलविक्रेत्यांची दुकानेही सजली होती. घाऊक बाजारात झेंडूची फुले ३० ते ४० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात सुमारे ६० रुपये किलो दराने विक्री होत होती. चौकट वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त बाजारपेठेतील गर्दीचा परिणाम वाहतुकीवरही झाला. बळीराम पेठ, सुभाष चौक, टॉवर चौक, नेहरू चौक आणि चित्रा चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची वाहने आणि पादचाऱ्यांची वाढलेली वर्दळ यामुळे मुख्य रस्त्यांवरून मार्ग काढणेही अवघड झाले होते. दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहात बाजारपेठ फुलली असली, तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT