जिल्ह्यातील चारशे जणांच्या मान्यता रद्द
(उपशीर्षक)
शालार्थ आयडी घोटाळा; शिक्षण विभागाकडून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गेल्या आठवड्यात नाशिक विभागीय कार्यालयाकडून माध्यमिक शिक्षण विभागाला मिळालेल्या आदेशानुसार मान्यता रद्दची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात मंगळवारी (ता. २७) ४०० बोगस वैयक्तिक मान्यता रद्दचे आदेश देण्यात आले.
राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यात शासनाची १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, घोटाळ्यात सर्वाधिक प्रकरणे जळगाव जिल्ह्यातील आहेत. नाशिक विभागातील ८९३ पैकी जळगाव जिल्ह्यातील ६५० मान्यता रद्दचे आदेश नाशिक विभागीय कार्यालयाने दिले आहेत.
शिक्षण विभागाकडून मान्यता रद्दचे आदेश
दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेशपत्र संस्थाचालक व संबंधित शिक्षकांना देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंगळवारी प्राप्त आदेशनुसार, वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ६५० पैकी माध्यमिक शिक्षण विभागाकडून चारशे जणांच्या मान्यता रद्दचे आदेश संबंधित संस्थांकडे देण्यात आले आहेत. उर्वरित मान्यता रद्दचे आदेशही पुढील दिवसांत दिले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.