सेकंड मेन
NSK26H33639
जळगाव : जिल्हा रुग्णालयात आक्रोश करताना आई.
---
NSK26H33638
घटनास्थळावर पडलेला हेच ते धारदार शस्त्र.
--
NSK26H33635 : सनी डोळे
--
NSK26H33636
जिल्हा रुग्णालयात एकवटलेली गर्दी.
---
मेहुण्याच्या हल्ल्यात शालकाचा मृत्यू
कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने वार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात घरगुती वादातून मेहुण्याने शालकावर प्राणघातक हल्ला केल्याने सनी विनोद डोळे (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.२६) दुपारी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून हल्लेखोर मेहुणा सचिन वानखेडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरुन प्राप्त माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याचा मेहुणा सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी,ता. भुसावळ) यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून आज दोघांमध्ये हाणामारी होऊन सुरज वानखेडे याने धारदार शस्त्राने सनी डोळे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच धावपळ उडून जखमीला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती सनी याचा मृत्यू झाल्याचे घोषित करताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या आईस भोवळ येऊन ती खाली कोसळली, तर आजी आणि बहिणीचा आक्रोश मन हेलावणारा होता.
वृद्ध आजी जखमी
सनीवर हल्ला होताना त्याची आजी सुमनबाई तायडे यांनी मध्यस्थी करून नातवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्या स्वतः यात जखमी झाल्या. साेबत इतर दाेघांनाही सनीला वाचविताना शस्त्र लागल्याने जखमा झाल्याचे सांगण्यात आले.
चौकट
संशयित अटकेत
हल्ल्याची माहिती मिळताच निरीक्षक सागर शिंपी पथकासह दाखल झाले. घडला प्रकार खुनाचा असल्याचे कळताच
अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी रुग्णालयात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. हल्ल्याबाबत कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून संशयित सुरज नारायण वानखेडे याला पोलिस पथकाने ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांसमक्ष दिली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.