जळगाव जिल्ह्यातून
चारा वाहतूक, विक्रीस मनाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत ट्रीगर- १ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर जिल्ह्यांत, तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात चाराटंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील अधिकारांचा वापर करून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे.
या आदेशात हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, कोणत्याही प्रकारची पेंढ, टीएमआर व इतर पशुखाद्य यांचा समावेश आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हा आदेश १ ऑक्टोबरपासून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी घुगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.