नाशिक

ग्रॅपलिंग- मलयुद्ध स्पर्धेत बाजी

CD
NSK26H33971 जळगाव : उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्यपदक मिळविणारे जळगावचे पैलवान. ------ जळगावच्या तिघा पैलवानांची ग्रॅपलिंग- मलयुद्ध स्पर्धेत बाजी उपशीर्षक नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उत्तराखंड येथे झालेल्या ग्रॅपलिंग- मलयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. या यशामागे त्यांचे वस्ताद पैलवान चेतन शिंदे, पैलवान कल्पेश मराठे, पैलवान आशिष ठाकरे आणि पैलवान भैया पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे, सातत्यपूर्ण सरावामुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या तरुण पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले. चौकट प्रेरणादायी पाठिंबा आणि सहकार्य जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनामुळे या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Latest Marathi News Update: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत होणार

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

SCROLL FOR NEXT