NSK26H33835
जळगाव : मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करताना पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड आणि पथक.
---
तीन लाखांचे गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत
जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या चिकाटीतून गुन्ह्यांचा उलगडा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : एमआयडीसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १८ गहाळ झालेले मोबाईल शोधून काढले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असून, पोलिसांनी ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. गहाळ मोबाईल परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सहज उमटत होता.
गहाळ झालेले, चोरी झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आपल्या पथकाला तयार करत शोध मोहीम सुरू केली होती. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
चौकट
तांत्रिक विश्लेषणाद्वारे यश
पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलसंदर्भात तांत्रिक तपासणी करण्यात आली. सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलिस अंमलदार मोतीलाल बोरसे, प्रमोद लाडवंजारी आणि रामकला राठोड यांनी तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करून विविध ठिकाणचे एकूण १८ मोबाईल फोन यशस्वी हस्तगत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.