नाशिक

शालार्थ आयडी घोटाळा

CD
वेतन थांबविण्याच्या आदेशपत्र वितरणास सुरुवात (उपशीर्षक) शालार्थ आयडी घोटाळा; संस्‍थाचालकांकडून फायलीही मागविल्‍या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नाशिक विभागीय कार्यालयाकडून माध्यमिक शिक्षण विभागाला मिळालेल्या आदेशानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेशपत्र संस्‍थाचालक व संबंधित शिक्षकांना देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्‍यान, सोमवारी (ता. २६) जिल्‍हा परिषदेच्‍या विद्यानिकेतन शाळेत शिक्षण विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी घोटाळ्यात समाविष्ट असलेल्‍या संस्‍थाचालकांकडून काही फायली मागवून जमा केल्‍या आहेत. जिल्ह्यातील बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याद्वारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, जळगाव जिल्हा या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य केंद्र बनला आहे. या घोटाळ्यात सर्वाधिक प्रकरणे जळगाव जिल्‍ह्यातील आहेत. नाशिक विभागातील ८९३ मान्यता रद्द होणार असून, जळगाव जिल्‍ह्यातील ६५० मान्यता रद्दचे आदेश आहेत. ...तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता रद्द करण्यासह शासकीय वेतन अनुदान थांबविण्याची कार्यवाही आता होणार आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, तत्कालीन मुख्याध्यापक आणि लाभार्थी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी करून काहींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्‍पष्ट निर्देश आहेत. चौकट शिक्षणाधिकारी नाशिकला शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत कारवाईला वेग आला असून, माध्‍यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांसह काही कर्मचारी रडारवर आहेत. या प्रकरणी माध्‍यमिक शिक्षणाधिकारी कल्‍पना चव्‍हाण सोमवारी (ता. २६) नाशिकला गेल्‍या होत्‍या. याबाबत माध्‍यमिक शिक्षण विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

GIFT City Investment: ‘गिफ्ट सिटी’ : गुंतवणुकीचा नवा मार्ग

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT