नाशिक

कंपनीत गुंतवणुकीच्या नावे सव्वा कोटींचा गंडा

CD
NSK26H33106 जळगाव : संशयित दीपेश रूपानीबरोबर पथकासह पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निरीक्षक नितीन पाटील आदी. --- गुंतवणुकीच्या नावे सव्वाकोटीचा गंडा --- म्होरक्यास बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक; धावत्या रेल्वेतून पळताना पोलिसांची झडप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : थेट उत्पादने विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे नागरिकांना एक कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घालून वर्षभरापासून फरारी असलेला संशयित दीपेश कमलेश रूपानी (रा. सुमन रेजिडेन्सी, जळगाव) याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक केली. धावत्या रेल्वेतून उतरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी त्याला पकडले. कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांची एक कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग आहे. मुख्य संशयित दीपेश रूपानी दीड वर्षापासून फरारी होता. पोलिसांनी जोधपूर, अमरावती, खामगाव, बडनेरा येथे त्याचा शोध घेतला. तो ठिकाणे व मोबाईल क्रमांक बदलत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने टक्कल करून पेहरावही बदलला. अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे विविध पेहरावांतील छायाचित्रे तयार करून पोलिसांनी त्याला शोधून काढले. धावत्या रेल्वेतून घेतली उडी दीपेश रूपानी मुंबई ते नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह सहायक निरीक्षक ईश्वर पाटील, सहायक फौजदार विजय निकुंभ, प्रीतमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार, विजय शिरसाठ भुसावळ स्थानकावरून दुरांतो एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी धावत्या रेल्वेत दीपेशचा शोध घेतला. बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेचा वेग कमी होताच त्याने एक्स्प्रेसमधून उडी घेत पळ काढला. मात्र, पोलिसांनी झडप घालून रूपानीला ताब्यात घेतले. चौकट पोलिसांकडून आवाहन कंपनीच्या नावाने फसवणूक करण्याचे आमिष दाखवून इतरही कोणाची फसवणूक झाली असेल, तर फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT