नाशिक

करार झाला, कार्यादेशही निघाला; तरी शहरातील पथदिवे अंधारातच

CD
मेन फिचर टुडे ४ --- (बंद पथदीपांचा संग्रहित फोटो वापरावा) --- करार झाला, कार्यादेशही निघाला; तरी पथदीप बंदच आठ हजार दिव्यांच्या दुरुस्तीचे काम रखडले; दिवाळीतही अनेक भागांत अंधार, नागरिकांची नाराजी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : दिवाळीच्या सणात संपूर्ण शहर प्रकाशाने उजळून निघेल, अशी अपेक्षा असताना जळगावकरांना मात्र अनेक भागांत अंधाराचा सामना करावा लागला. शहरातील बंद आणि मंद प्रकाश देणाऱ्या सुमारे आठ हजार पथदीपांच्या दुरुस्ती व बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, या कामासाठी महापालिकेने एजन्सीसोबत करारनामा करून अधिकृत कार्यारंभ आदेशही दिला आहे. मात्र, दिवाळी उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात सुमारे २२ हजार पथदीपांचे खांब आहेत. त्यापैकी जवळपास दोन हजार ४०० दिवे पूर्णपणे बंद आहेत, तर सुमारे पाच हजार दिव्यांचा प्रकाश मंदावला असून ते पिवळसर प्रकाश देत आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास आठ हजार पथदीपांची दुरुस्ती अथवा बदल करणे आवश्यक आहे. अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि अंतर्गत भागांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. करारानंतरही कामाची प्रतीक्षाच पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्ती, नवीन एलईडी दिव्यांचा पुरवठा आणि अद्ययावत सीसीएमएस प्रणाली उभारण्यासाठी महापालिकेने तेलंगणातील ''मेसर्स बीएसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड'' आणि ''मेसर्स व्हिंक्शन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड'' या संयुक्त एजन्सीला काम दिले आहे. दहा वर्षांच्या करारानुसार हे काम केले जाणार आहे. कार्यादेशानंतर काम सुरू करण्यापूर्वी साहित्य संकलन व पूर्वतयारीसाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे चित्र आहे. चौकट नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी दिवाळीपूर्वी शहरातील पथदिवे सुरू होतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सणाच्या दिवसांतही अनेक रस्ते अंधारात राहिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालक, पादचारी आणि महिलांना अंधाऱ्या रस्त्यांवरून ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आता तरी महापालिका प्रशासनाने संबंधित एजन्सीकडून काम सुरू करून घेण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

Latest Marathi News Live Update: काझीरंगातील भीषण अपघातात २ वर्षांचा चिमुरडा बचावला; आई-वडिलांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT