टुडे १, ॲन्कर
---
NSK26H33284 (डॉ. अविनाश आचार्य)
NSK26H33285 (केशवसुत)
NSK26H33286 (भवरलाल जैन)
----
तंत्र विद्यालयांना केशवसुत, डॉ. आचार्य, भवरलाल जैनांचे नाव
उपशीर्षक
कौशल्य, उद्योजकता विभागाचा निर्णय; जिल्ह्यातील तांत्रिक विद्यालयांचे नामांतर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडे प्रस्तावित असलेल्या राज्यातील विविध शासकीय तंत्र विद्यालयांच्या नामकरणाबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या स्व. डॉ. अविनाश आचार्य, भवरलाल जैन यांच्यासह कविवर्य केशवसुत यांची नावे तंत्र विद्यालयांना देण्याबाबत निर्णय घेऊन शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माणण करणे व माध्यमिक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख, अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची मुलभूत तत्त्वे व विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मुलभूत तत्त्वे हे तीन बहुकौशल्ययुक्त पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. इयत्ता नववी व दहावीच्या स्तरावर हे अभ्यासक्रम राबविण्यात येत असून ते राबविणारी राज्यात १६२ शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यान्वित आहेत.
विद्यालयांचे नामांतर
कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागांतर्गत गठीत एकसदस्यीय समितीस शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नामांतराचा निर्णय प्रलंबित होता. तो नुकताच घेण्यात आला असून त्याद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तंत्र विद्यालयांचे नामांतर करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी (ता.२१) घेण्यात आला.
चौकट
डॉ. आचार्य, जैन यांच्यासह
केशवसुतांच्या कार्याचा गौरव
हे नामांत करताना संबंधित विभागाने जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे या विद्यालयांना दिली आहेत. त्यानुसार जळगाव येथील तंत्र विद्यालयास डॉ. अविनाश आचार्य, जामनेरमधील तंत्र विद्यालयास भवरलाल जैन यांचे, भुसावळ येथील तांत्रिक विद्यालयास डी. के. चौधरी, वरणगाव येथील विद्यालयास कविवर्य केशवसुत यांचे नाव तर मुक्ताईनगर येथील विद्यालयास दगडू राठोड शासकीय तंत्र विद्यालय असे नाव देण्यात आले आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.