नाशिक

दिवाळीचा उत्साह ओसरला; शहरात कचऱ्याचे ढीग कायम

CD
टुडे पान ४, मेन फिचर NSK26H34822 जळगाव : खानदेश सेंट्रलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला कचरा. NSK26H34884 जळगाव : मनपा आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी गटार स्वच्छतेचे काम करतांना. ......... दिवाळीचा उत्साह ओसरला; शहरात कचऱ्याचे ढीग कायम मुख्य रस्ते, बाजारपेठात कचरा; वाहनांची संख्या वाढवूनही कचरा संकलनाचा प्रश्न कायम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : दिवाळीचा सण संपला, मात्र शहरातील कचऱ्याचे ढीग हटण्याचे नाव घेत नाहीत. सणाच्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त कचऱ्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळांमध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. महापालिका आणि बीव्हीजी कंपनीकडून सुटीच्या काळातही स्वच्छता व कचरा संकलन सुरू असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचरा उघड्यावर पडून असल्याने स्वच्छतेच्या नियोजनाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. आर. आर. शाळेमागील गल्ली, गोलाणी मार्केट परिसर, बळीरामपेठ, सुभाष चौक रस्ता, महात्मा फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केटसह शहरातील विविध प्रमुख भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेष म्हणजे, बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यांवरच कचरा पडून असल्याने व्यापारी, ग्राहक आणि पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यातून निर्माण झालेला कचरा वेळेत उचलला न गेल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. कंपनीकडून कचरा संकलनासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात आली असली, तरी रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग कमी होताना दिसत नाहीत. महापालिकेचे कर्मचारी आणि कंपनीची यंत्रणा सुटीच्या काळातही कार्यरत असताना कचरा साचतोच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहनांची संख्या वाढविण्यापेक्षा संकलनाच्या नियोजनावर आणि प्रत्यक्ष कामाच्या परिणामकारकतेवर लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा स्वच्छतेच्या दाव्यांमध्येच शहराची स्वच्छता हरवण्याची वेळ येईल. चौकट स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची अविरत सेवा दिवाळीच्या कालावधीत शहरातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि विविध परिसरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी नियमितपणे काम केले. दिवाळीत फटाके फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा, फटाक्यांचे अवशेष, कागद, प्लास्टिक तसेच इतर घनकचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

SCROLL FOR NEXT