नाशिक

शहाद्यातील तरुण जळगावातून बेपत्ता

CD
शहाद्यातील तरुण जळगावातून बेपत्ता जळगाव : शहरातील खान्देश सेंट्रल परिसरातून २२ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. शनिवारी (ता.७) रात्री साडेअकरा वाजता बेपत्ता झाल्याची पोलिसांत नोंद असून मुज्जमील शाह अजीज शाह (वय २२, रा. गरीब नवाज कॉलनी, १४ नंबर शाळेजवळ, शहादा, जि. नंदुरबार) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक रवींद्र पाटील तपास करीत आहेत. -------- घराबाहेरुन दुचाकी लंपास जळगाव : शहरातील वानखेडे हौसिंग सोसायटीतील रहिवासी नितीन अमृत सोनवणे (वय ३३) यांची दुचाकी (एमएच.१९, ईवाय.७३२४) चोरट्याने घरासमोरुन चोरुन नेल्याची घटना ९ नोव्हेंबरला समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक गजानन पवार हे करीत आहेत. ------- अज्ञात प्रौढाचा रेल्वेखाली मृत्यू जळगाव : नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीत रेल्वे अपघातात ५० ते ६० वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नशिराबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नातेवाईकांचा शोध पोलिस घेत असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. पोलिसांत दाखल अकस्मात मृत्यूचा तपास पोलिस नाईक अनिल देशमुख करीत आहेत. ---- भोलाणे शिवारात तरुणाचा मृतदेह जळगाव : तालुक्यातील भोलाणे शिवारातील एका शेतात ३८ वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आला आहे. गलू देविदास सपकाळे (वय ३८, रा. भोलाणे, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, तो सोमवारपासून (ता.९) घरातून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांचा शोध सुरू होता. शुक्रवारी (ता.१३) एका शेतात अनोळखी मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून मृतदेहाजवळच या तरुणाची दुचाकी (एमएच-०५-एल-५६६१) मिळून आली असून कुटुंबीयांतर्फे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मयताचा भाऊ मनोज कोळी याच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

Latest Marathi News Live Update: मुंबईतील नरिमन हाऊसची रेकी; एटीएसकडून २० वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT