bjp e sakal
नाशिक

भाजपच्या नव्या चार मंत्र्यांची १६ पासून 'जनआशीर्वाद' यात्रा

विक्रांत मते

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नारायण राणे, डॉ. भागवत कराड व कपिल पाटील या चार मंत्र्यांची जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. यासंदर्भात भाजप कार्यालयात नियोजनाची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी माहिती दिली. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह सर्व विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्टदरम्यान, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे.

डॉ. भारती पवार यांच्या यात्रेत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटरचा समावेश आहे. १६ ऑगस्टला पालघर येथून सकाळी दहाला सुरवात होइल. मनोर, चारोटी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे त्र्यंबकेश्‍वर येथे रात्री आठला यात्रा पोचेल. १७ ऑगस्टला सकाळी नऊला शहरात दहावा मैल येथून सुरवात होईल. ओझर, पिंपळगाव, शिरवडे फाटा, वडाळीभोई, चांदवड, उमराणे, सौंदाणे, टेहेरे, मालेगाव चौफुली, सटाणा नाका येथे पोचेल. १८ ऑगस्टला सकाळी आठला मालेगाव येथून सुरवात होईल. नामपूर, ताहाराबद, पिंपळनेरमार्गे धुळे येथे यात्रेचे प्रयाण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT