NSK26H31207
जळगाव : जनआक्रोश महामोर्चाच्या बैठकीत बोलताना मुकुंद सपकाळे. सोबत पदाधिकारी.
---------
उपवर्गीकरण सत्तेचेच षडयंत्र हाणून
पाडण्यासाठी मोर्चाला यशस्वी करा
सपकाळे : जळगावात आज जनआक्रोश महामोर्चा
.
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : शहरात रविवारी (ता.४) आयोजित जनआक्रोश महामोर्चास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनाप्रमुख आनंदराज आंबेडकर, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा ‘आरपीआय’ (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप, भीमशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे, ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची मोर्चास उपस्थिती राहणार आहेत.
उपवर्गीकरण सत्तेचेच षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी शुक्रवारी (ता.२) येथे उपवर्गीकरणाच्या मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना केले
भारतीय संविधानाच्या अनुषंगाने अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षणाच्या तरतुदी या संविधानिक स्वरूपात आहेत. धर्माधर्मांत व जातीजातींत तेढ निर्माण करून बेरोजगारी, महागाई, शिक्षण अशा सर्व पातळ्यांवर असणाऱ्या अनेक प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी उपवर्गीकरणाचे षडयंत्र सत्तेचेच असून, हे आणून पाडण्यासाठी हा महामोर्चा निघणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी राजू मोरे, प्रमोद इंगळे, विजय घोरपडे, सतीश गायकवाड, गोविंदा पवार, जयसिंग वाघ, हरिशचंद्र सोनवणे, नीलू इंगळे, संध्या तायडे, आबा मोरे यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना मांडून शांततापूर्ण वातावरणात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
अक्षय निकम, मोनू अडकमोल, कार्तिक निकम, कांता सपकाळे, वाल्मीक जाधव, गीता सोनवणे, जगदीश सपकाळे, नारायण सोनवणे, किसन सपकाळे, सुभाष सपकाळे, उखर्डू सोनवणे, महेंद्र केदार, जितेंद्र राजपूत, भय्या सपकाळे यांनी मोर्चा आयोजना मागील उद्देश व नियोजनात येणाऱ्या अडचणीसंदर्भात चर्चा केली. प्रा. प्रीतीलाल पवार यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
...यांचाही राहणार सहभाग
रिपब्लिकन सेना, जनक्रांती मोर्चा, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय चर्मकार सेवा संघ, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, भीमशक्ती, चर्मकार महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदी अनेक संघटना उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चात सहभागी होणार आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.