नाशिक

जनआक्रोश मोर्चामुळे शहर वाहतुकीत बदल

CD
जनआक्रोश मोर्चामुळे जळगावातील वाहतुकीत बदल आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक मार्ग आज दुपारी बारापासून बंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवारी (ता. ४) दुपारी दोनला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टळून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक यांनी पूर्वतयारी बैठकीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रविवारी (ता. ४) दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत आकाशवाणी चौक ते न्यायालय चौक या मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आकाशवाणी चौकाकडून न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस : आकाशवाणी चौक, कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकूळ स्विट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्स, न्यायालय चौक. न्यायालय चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने व एस.टी. बसेस : न्यायालय चौक, शाहू कॉम्प्लेक्स, गोकूळ स्विट मार्ट, रिंगरोड, कवयित्री बहिणाबाई उद्यान, आकाशवाणी चौक. नेरी नाक्याकडून स्वतंत्र चौकाकडे येणारी वाहने : नेरी नाका, पांडे चौक, सिव्हिल हॉस्पिटल, बेंडाळे चौक, चित्रा चौक, न्यायालय चौक. प्रभात चौकाकडून नेरी नाका / न्यायालय चौकाकडे जाणारी वाहने : प्रभात चौक, कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, गोकूळ स्वीट मार्ट, शाहू कॉम्प्लेक्स, न्यायालय चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका. चौकट नागरिक, वाहनधारकांना आवाहन मोर्चाच्या कालावधीत नागरिकांनी व वाहनधारकांनी वरीलप्रमाणे दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच अनावश्यकपणे मोर्चाच्या मार्गावर वाहने आणू नयेत आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव पोलिस प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय! मृतदेहाजवळ नारळ, लिंबू, अंडी अन् दारूची बाटली, घटना CCTV त कैद

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ नोव्हेंबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

चेतना तरंग : पूर्वग्रह आणि मते

Unemployment: 'AI मुळे नोकऱ्या गेलेल्या बेरोजगारांना व्हिडिओ गेम्समध्ये गुंतवा!' अँथ्रोपिकच्या सीईओंनी सुचवला धक्कादायक पर्याय

SCROLL FOR NEXT