नाशिक

टुडे पान २ साठी... अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती -- फोटो क्रमांक : 34148 धुळे : हरिद्वार येथे झालेल्या राष्ट्रीय ग्राफलिग व मल्लयुद्ध (कुस्ती) स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक पटकावणारी जान्हवी पाथरवट हिचा सत्कार करताना सेवाभारती धुळेचे पदाधिकारी. - सेवाभारती धुळेतर्फे जान्हवी पाथरवटचा सत्कार धुळे : हरिद्वार येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ग्राफलिग व मल्लयुद्ध (कुस्ती) स्पर्धेत जान्हवी धर्मनाथ पाथरवट हिने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल सेवाभारती धुळेतर्फे अभ्यासिकेत तिचा सत्कार करण्यात आला. जान्हवीला दप्तर व मिठाई देऊन गौरविण्यात आले. सेवा वस्तीतील साधारण कुटुंबातील, सेवाभारतीच्या शिवण वर्गातील रंजना पाथरवट यांची ती मुलगी आहे. सत्कार सोहळ्याला प्रांत फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रमुख अनिल वाणी, सेवाभारतीचे उपाध्यक्ष घनश्याम जोशी, जिल्हा सचिव संध्या कुलकर्णी, सहसचिव अजय जोशी, शिक्षण आयाम प्रमुख विभांडीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाप्रमुख हर्षद अधिकारी, कोषाध्यक्ष माधुरी शुक्ल, राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत सेवा प्रमुख मालती राठोर, शिवण वर्ग शिक्षिका साक्षी उपस्थित होत्या. -- ‘जयहिंद’चा बास्केटबॉल संघाची राज्यस्तरावर निवड धुळे : नाशिक विभागस्तरीय शालेय १९ वर्षांखालील बास्केटबॉल स्पर्धेत जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे दोन्ही संघांची आगामी शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना प्राचार्य डी. व्ही. निकम, उपप्राचार्य करंदीकर, पर्यवेक्षक सोनवणे, क्रीडा शिक्षक योगेश चव्हाण, प्रीतम साळुंखे, मिलिंद पाटील, प्रा. संजय देवरे यांचे मार्गदर्शन झाले. -- विशेष शिक्षकांचा गौरव सोहळा धुळे : देवपूर येथील सन्मती मतिमंद विद्यालयातील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सात शिक्षकांचा सेवा संकल्प अभियानांतर्गत गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते दिशा अभियान व महाराष्ट्र शासनातर्फे हा सन्मानपत्र प्रदान सोहळा पार पडला. बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक गरजा व क्षमता लक्षात घेऊन सुप्त गुण विकसित करणे होय. येथील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, सामाजिक जुळवून घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संयम व संवेदनशीलता बाळगून कार्य करीत आहेत. या योगदानामुळे विशेष शिक्षण क्षेत्रातील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हे कार्य असेच निरंतर सुरू राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त केला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जास्तीत जास्त झाडे वाचवून नवीन लागवडीवर भर देणार"

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

SCROLL FOR NEXT