Gymnastics gold medal winners Sonali Borade and Ritesh Borade from Janori in Igatpuri taluk performing gymnastics at the international sports arena. esakal
नाशिक

जानोरीच्या जिम्नॅस्टिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आर्थिक मदतीची गरज

ज्ञानेश्वर गुळवे

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सोनाली चंद्रभान बोराडे आणि रितेश चंद्रभान बोराडे हे दोघे बहिणभाऊ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत.

१२ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पंधरा खेळाडू आणि गोवा राज्यातून पाच खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून जानोरी या दुर्गम भागातील या खेळाडूंची निवड झाली आहे. (Janori Gymnastics Gold Medalist Need Financial Help Nashik Latest marathi news psl98)

ही स्पर्धा २३ ते २८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कझाकिस्तान येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना येणारा एकूण अंदाजे खर्च ३ लाख २८ हजर इतका आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

विविध नागरिकांकडून त्यांना यथाशक्ती शक्य तेवढी मदत केली जात आहे. मात्र रक्कम मोठी आहे आणि येत्या दोन दिवसात विमानाचे तिकीट बुक करावयाचे असल्याने दानशूर व्यक्तींनी मदत केल्यानंतर ठराविक कालावधीत पुढील कागदपत्रे जमा करावयाची असल्याने उशीर करु नये अशी विनंती देखील करण्यात आली आहे. आपल्या मदतीमुळे तालुक्याचे जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे.

त्यामुळे सामाजिक संस्था,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी,माजी खेळाडू आदींनी सामाजिक दायित्व जपून सढळ हाताने भरीव मदत करावी अशी अपेक्षा या खेळाडूंना आहे.

आर्थिक मदतीसाठी दानशूरांनी सोनाली चंद्रभान बोराडे हिच्या कोटक महिंद्रा बँक खाते क्रमांक 5246754366, IFSC CODE KKBK0001361 आणि Gpay / phonepay / paytm 7977051548 यावर आपली मदत पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले आहे.

" इगतपुरी तालुक्यातील जानोरी सारख्या दुर्गम भागातील आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य आहे.रोजगारासाठी आम्ही मुंबई कडे स्थलांतरित झालो आहोत. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन आपल्या गावाचे,तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेच्या माध्यमातून जगभरात गाजवायचे आहे. आता केवळ जनतेच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे."

-सोनाली बोराडे, जिम्नॅस्टिक सुवर्ण पदक विजेती.

" दानाने धनाची शुद्धता होत असते. म्हणूनच आपल्या तालुक्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात पाठवण्यासाठी आपला स्वाभिमान जागृत करुन समाजातील प्रत्येक घटकांनी या आशियाई स्पर्धेत जिंकण्यासाठी आपल्या भावा बहिणीला मनापासून आर्थिक मदत करुन सहकार्य करावे." -नारायण जाधव,अध्यक्ष सकल मराठा समाज इगतपुरी.

(छायाचित्र:ज्ञानेश्वर गुळवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT