Javed Akhtar said It was a matter of pride that there were poets in marathi 800 years ago Sakal
नाशिक

'आठशे वर्षांपुर्वी मराठीत कवयत्री होत्या, ही अभिमानाची गोष्ट'

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : तब्बल आठशे वर्षांपासून आपल्याकडे मराठीत महिला साहित्यिक आहेत, तेव्हा विदेशात कोणी कविता लिहीत नव्हतं आपण यावर आभिमान बाळगला पाहिजे असे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन समारंभचे प्रमुख पाहुणे गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी व्यक्त केले.

आपल्याकडे मुक्ताबाईनी मराठीत आठशे वर्षांपुर्वी लिखाण केलं आणि हे जगात कुठेच झालं नाही, 200 वर्षांपूर्वी विदेशात महिला पुरुषांच्या नावाने लेख, कविता लिहायच्या. मात्र मराठीत पहिली लेखीका आणि पहिली महीला डॉक्टर झाली. मिराबाईंनी 400 वर्षापुर्वी लिखाण केलं पण हिंदीच्या आधी मराठी लिखाण एका महिलेने मराठीत केलं असे जावेद अख्तर म्हणाले.

त्यांनी सांगीतलं की, मला काही मित्र मराठी पहिल्यांदा मराठी नाटक पाहायला घेऊन गेले तेव्हा मला कुणीतरी जोरदार चापट मारल्यासारखं वाटलं, ते नाटक होतं विजय तेंडुलकर यांचं शांतता कोर्ट चालू आहे, मला या महान लेखकाबद्दल काही माहिती नव्हतं याची मला लाज देखील वाटली.

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, मराठीतील महान कवी तोच आहे जो जनतेशी संवाद साधतो, त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव हेच मराठीचे सर्वांत मोठे साहित्यिक आहेत आणि आपण त्यांच्यावर आभिनान बाळगला पाहिजे असे अख्तर म्हणाले. मराठी संतानी त्यांचं साहित्य सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत साहित्य लिहिलं. त्यांनी आपलं तत्त्वज्ञान झाडलं नाही तर लोकांशी संवाद साधला असे ते म्हणाले.

पुढे जावेद अख्तर म्हणाले की, भाषेच्या बाहेर देखील एक जग आहे, त्यामुळे भाषा ही एकमेकांना जोडणारा दुवा असली पाहिजे मात्र अनेक वेळा आज या भाषेमुळेच एकमेकांमध्ये दुरावा येतो, असे व्हायला नको असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT