sachine more.png 
नाशिक

BREAKING : चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना मालेगावातील जवानाला वीरमरण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील व मालेगाव तालुक्यातील निमगुले साकुरी येथील जवान चीनच्या सीमेवर शहीद झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. सचिन विक्रम मोरे असे या जवानाचे नाव असून ते काल (ता. २४) रात्री चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले असल्याचे समजते. दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव आधी पुणे येथे नंतर नाशिकहून त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना दिली.

अशी आहे घटना

सध्या भारत आणि चीन सीमेवर गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी दोन्ही देशांकडून रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी भारताकडून एक पूल बांधणीचे काम सुरु होते. याच वेळी चीनने नदीत पाणी सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीला पाणी सोडल्यामुळे तीन जवान वाहून चालले होते. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांनी नदीत उडी घेतली. परंतु नदीतील दगडावर तो कोसळल्याने तो शहीद झाल्याची माहिती सचिनच्या कुटुंबियांना लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सचिनचे पार्थिव उद्या निघणार असून रात्रीपर्यंत पुणे येथे पोहोचेल. त्यानंतर पुण्याहून हे पार्थिव नाशिकमध्ये येईल. 

नाशिकमधून पार्थिव मालेगाव तालुक्यातील निमगुले या मूळगावी शनिवारी (ता. २७) रोजी सकाळी पोहोचण्याची शक्यता आहे. सचिन 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते इंजिनिअर होते. मागील एक वर्षापासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. सीमेवर पूल, व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन यांना वीरमरण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT