JEE Main Exam esakal
नाशिक

JEE Mains Exam : जेईई मेन्‍स परीक्षा अर्जाची 12 मार्चपर्यंत मुदत

देशभरात ६ ते १२ एप्रिलदरम्‍यान परीक्षा घेण्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षा घेतली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी होत असलेल्‍या जेईई मेन्‍सच्‍या दुसऱ्या सत्रातील परीक्षा ६ ते १२ एप्रिलदरम्‍यान देशभरात घेण्याचे नियोजित आहे.

या परीक्षेला प्रविष्ट होण्याकरिता विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज करण्याची मुदत १२ मार्चपर्यंत निश्‍चित केलेली आहे. (JEE Mains exam application deadline till March 12 nashik news)

विद्यार्थ्यांना परीक्षेच्‍या दोन संधी उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत. या दोन परीक्षांतून सर्वोत्तम कामगिरीच्‍या आधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. त्‍यानुसार पहिल्‍या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा ही गेल्‍या महिन्‍यात जानेवारीमध्ये पार पडली होती.

या परीक्षेचा निकालही यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा एप्रिल महिन्‍यात घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षा ६ ते १२ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार असून १३ व १५ एप्रिल या तारखा राखीव ठेवण्यात आलेल्‍या आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

यापूर्वी पहिल्‍या सत्राच्‍या परीक्षेला प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांचा आधीचा अर्ज क्रमांक (ॲप्लिकेशन नंबर) आणि पासवर्डचा वापर करून पेपर, व परीक्षेचे माध्यम, घरचा पत्ता, शहराचा तपशील निवडीची संधी असेल.

सोबत ऑनलाइन शुल्‍क भरायचे असेल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पत्त्याचा पुरावा देणे बंधनकारक असणार आहे. एका विद्यार्थ्यास एकापेक्षा जास्‍त अर्ज करता येणार नाहीत. जर अशा प्रकारे दोन अर्ज केलेले विद्यार्थी आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई केली जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यातर्फे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT