JEE Main Exam esakal
नाशिक

JEE Mains Exam : रसायन, भौतिकशास्‍त्रच्‍या प्रश्‍नांनी फोडला घाम!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जानेवारी सत्रातील जॉईंट एन्‍स्‍ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षेला मंगळवार (ता.२४) पासून सुरवात झाली. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) सत्र पद्धतीने ही परीक्षा पार पडत असून, नाशिकमधील चार केंद्रांवर सुमारे सोळा हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

पहिल्‍या दिवशी सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रसायनशास्‍त्र, भौतिकशास्‍त्र विषयाच्‍या प्रश्‍नांनी बहुतांश विद्यार्थ्यांचा घाम फोडला होता. (JEE Mains Exam january semester started nashik news)

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरवरील संस्‍थांत प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा घेतली जाते आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेचे आयोजन केले आहे.

मंगळवारपासून परीक्षेला सुरवात झालेली असून, येत्‍या १ फेब्रुवारीपर्यंत सत्र पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे. २६ आणि २७ जानेवारी असे दोन दिवस सार्वजनिक सुट्या राहातील.

दरम्‍यान नाशिकमध्ये चार केंद्रांवर ही परीक्षा होते आहे. ॲपेक्‍स, मेट भुजबळ नॉलेज सिटी, फ्युचर टेक आणि बेबीज अशा चार केंद्रांवर होत असलेल्‍या या परीक्षेला सुमारे सोळा हजाराहून अधिक विद्यार्थी सामोरे जात आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले आहेत. या प्रवेशपत्रावर परीक्षेचा तपशील, तारीख वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती उपलब्‍ध करून दिलेली आहे.

कसून तपासणीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश

कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रातील संगणक कक्षात सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाते आहे. कागदपत्र पडताळणी करून घेताना एनटीएने सूचित केलेल्‍या दिशानिर्देशाचे पालन करतांना विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आहे. कोविड-१९ च्‍या पार्श्वभुमिवरदेखील खबरदारी बाळगली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Natural Gas: स्वच्छ इंधनाच्या दिशेने मोठे पाऊल! घरगुती गॅस स्वस्त होणार; देशभरात गॅस पाइपलाइन नेटवर्कचा झपाट्याने विस्तार

Kannad Election Deposit : कन्नड नगरपरिषद निवडणूक; ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; नगराध्यक्षासह अपक्षाचा फटका!

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT