Jewels worth 1 and half lakh were stolen pretending of polishing nashik crime news 
नाशिक

Nashik Crime News: पॉलिशच्या बहाण्याने दीड लाखांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूर परिसरातील अशोकनगरमध्ये भांडी पॉलिश करण्याचे काम करणाऱ्या दोघांनी ६० वर्षीय महिलेचे १ लाख ५३ हजारांचे दागिने पॉलिश करून देण्याचे बहाण्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jewels worth 1 and half lakh were stolen pretending of polishing nashik crime news)

श्रीमती दर्शना सुरेश गोयल (रा. मॉडन स्कूलच्या मागे, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १५) सकाळी दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास ३५ ते ४५ वयोगटातील दोन अज्ञात इसम भांडे पॉलिश करण्याचे काम करणारे आले होते. त्यांनी परिसरातील काही ग्राहकांची भांडी पॉलिश करून दिली. श्रीमती गोयल यांचीही भांडी पॉलिश केली.

त्यावेळी संशयितांनी त्यांना, तुमच्याकडील सोने असेल तेही पॉलिश करून देणे असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनीही घरातील १ लाख ५३ हजार ३०० रुपयांचे विविध प्रकारे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्यासाठी दोघा संशयितांकडे दिले.

संशयितांनी ते दागिने पॉलिशच्या बहाण्याने घेऊन श्रीमती गोयल यांची नजर चुकवून हातचलाखीने काढून घेतले आणि त्यानंतर बंद भांडे त्यांच्याकडे देत जरावेळाने उघडण्यास सांगितले.

त्यानंतर संशयित पसार झाले. श्रीमती गोयल यांनी ते भांडे उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक राजू पठाण हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT