नाशिक

जिजाऊनगरात दोन लाखांचे दागिने लंपास

CD
जिजाऊनगरात दोन लाखांचे दागिने लंपास --- जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : शहरातील जिजाऊनगरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाख ९२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. दागिने चोरुन नेणारा कुटुंबीयांच्या परिचयाचा असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप हिंमत राजपूत (वय ४३, रा. गट नं. १६६, प्लॉट नं. २, जिजाऊनगर, सावखेडा शिवार, गिरणा पंपीग रोड, जळगाव) यांच्या घरातून संशयित शुभम हिरालाल परदेशी (रा. तांदळी, ता. अमळनेर, ह.मु. जिजाऊनगर, जळगाव) आला होता. २७ सप्टेंबरला सकाळी अकरापासून ते ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी सहादरम्यान फिर्यादी घरी नसताना संशयिताने घरातील वरील मजल्यावरील बेडरुममध्ये प्रवेश केला. बेडरुममधील वॉर्डरोब बंद असलेला लाॅकर माहीत असलेल्या ठिकाणातून चावी काढून त्याने लॉकर उघडला. लॉकरमधील लाल रंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेले १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे, ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. संशय असल्याने प्रदीप राजपूत यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित शुभम हिरालाल परदेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक धनराज पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT