नाशिक

भाजप महिला मोर्चा आंदोलन

CD
धुळे टुडे २ साठी 32517 धुळे : जेएनयूतील विद्यार्थीनींच्या लैंगिक छळप्रकरणी संशयित काँग्रेस खासदारावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराणा प्रताप चौकात निदर्शने करतांना भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या. --- जेएनयूतील लैंगिक छळप्रकरणी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन --- खासदार प्रा. अकोइजामा यांच्यावर कारवाईची मागणी --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ११ विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळप्रकरणी संशयित काँग्रेसचे खासदार प्रा. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा धरती देवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदारांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. संबंधित खासदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी, पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेवरही भाजप आंदोलनकर्त्यांनी टिका केली. आंदोलनात श्रीमती देवरे, माजी महापौर जयश्री आहिरराव, प्रतिभा चौधरी, नगरसेविका कल्याणी अंपळकर, भाजप शहराध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका कविता सोनवणे, मोहिनी धात्रक, शीला भडांगे, देवयानी जगताप, देवयानी बडगुजर, हर्षदा पाटील, योगिता खलाणे, प्रतिभा देवरे, मधुमती देवरे, स्वाती बोरसे, मीनाक्षी मोरे, वैशाली अहिराव, संगीता सूर्यवंशी, जिजाबाई पाटील, अनिता पाटील, सोनाली आहिरे, प्रतिभा पाटील, कविता पाटील, वैशाली सोनवणे, प्रिया सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT