Dignitaries handing out job letters to youths at the employment fair held on the eve of MLA Suhas Kande's birthday. esakal
नाशिक

Nashik News: मनमाडला 776 तरुणांना नोकरीचे पत्र; आमदार कांदेंच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज मनमाड शहरात झालेल्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक, सिन्नर येथील तीसपेक्षा अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या मेळाव्यात ११३३ तरुणांनी नोकरीसाठी मुलाखत दिली. यातील ७७६ तरुणांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले. यामुळे तरूणांनी एकच जल्लोष केला. (job letter to 776 youth Response to employment meeting on occasion of MLA Kande birthday at manmad Nashik News)

दुष्काळी परिस्थिती पाहता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमदार सुहास कांदे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात नाशिक, सिन्नर येथील रिंगगेअर ॲक्वा, शारदा मोटर्स, बजाज सन्स, हिताची जळगाव, एम डी इंडस्ट्रीज, एलआयसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टपारिया टूल, सतीश टोय, वैष्णवी ऑटो, किंप क्लॉथ, आर्ट रबर, व्हीआयपी आदी ३० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यास मतदारसंघातील तरुण- तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने नोकरीसाठी मुलाखती दिल्या. यावेळी ११३३ उमेदवारांनी नोकरीसाठी थेट मुलाखत दिली. यातील तब्बल ७७६ मुलांना तत्काळ ऑफर लेटर देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संपर्क कार्यालयात तरुणांसाठी सोय सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान खान, अल्ताफ खान, जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, बबलू पाटील, सौ. संगीता बागूल, विद्या जगताप, पूजा छाजेड यांच्या हस्ते प्रत्येकाला ऑफर लेटर देण्यात आले.

मेळाव्याचे नियोजन औद्योगिक कामगार सेनेचे सरचिटणीस रवी देवरे यांनी केले होते. नांदगाव, मनमाड, मालेगाव येथील संपर्क कार्यालयातही नोकरीसाठी नोंदणी सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथे बोलावले जाणार आहे.

त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार कांदे यांनी म्हटले आहे. वाल्मीक आंधळे, लाला नागरे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, दिनेश घुगे, नीलेश ताठे, विशाल सुरवसे, स्वराज देशमुख, अमोल दंडगव्हाळ, सचिन दरगुडे, नीलेश व्यवहारे, योगेश इमले, अमीन पटेल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT