नाशिक

जिल्ह्यात नवरात्रोत्सव तयारीची लगबग

CD
KPD26B13425, KPD26B13426 कापडणे : तेरा कुळांची कुलदेवता जोगाई माता. दुसऱ्या छायाचित्रात जोगाईमातेचे मंदिर. --------- जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सव तयारीची लगबग अकरा ऑक्टोबरपासून प्रारंभ; मंदिरे भाविकांनी गजबजणार सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ३ : शारदीय अश्विन नवरात्रोत्सव येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. धुळे जिल्ह्यातील सर्वच कुलदेवतांच्या मंदिरांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. मंदिरांवर आकर्षक रोषणाई व सुशोभिकरणाची कामे वेगात सुरू आहेत. नवरात्रोत्सव गरबा मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अनेक जागृत कुलदेवतांची मंदिरे आहेत. यामध्ये एकविरा माता (धुळे), धनदाई माता (म्हसदी), पेडकाई माता (सावळदे), जोगाई माता (कापडणे), धनाई पुनाई माता (निजामपूरजवळ), बिजासनी माता (शिरपूर ते सेंधवा दरम्यान), जोगेश्वरी माता (जोगशेलू), योगेश्वरी माता, संतोषी माता (धुळे), पाच पावली माता व कालिका माता (कापडणे), भवानी माता (कुसूंबा), आशापुरी माता (पाटण), अन्नपूर्णा माता (कापडणे), भटाई माता (भदाणे), म्हाळसा माता (अर्थे), इंदाशी माता (कुंडाणे), सती माता (बोरीस) आदी कुलदेवतांचा समावेश आहे. येथील तेरा कुळांची कुलदेवता असलेल्या जोगाई माता मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीकडून स्वच्छता, पाणी, मंडप व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे. नवरात्रोत्सव काळात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

SCROLL FOR NEXT