Eknath Navale, Sanjay Jachak, Bajirao Navale etc. while starting the tiger-fowl performance. esakal
नाशिक

Nashik: पाथर्डीत रंगली वाघ्या- मुरळी पार्ट्यांची जुगलबंदी अन् ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ गजर

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : कालभैरवनाथ महाराज जयंतीनिमित्त पाथर्डी गावात गेल्या ३० वर्षांपासून वाघ्या मुरळ्याच्या पार्टीचा सहभागाने रंगणाऱ्या खंडोबाच्या यात्रेत बुधवारी (ता. १६) कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर घुमला. शहर परिसरातील वाघ्या मुरळीच्या पार्ट्या या यात्रोत्सवात सहभागी होतात आणि आपली कला सादर करतात. (Jugalbandi of waghya murali at Pathardi after 2 years Yelkot Yelkot Jai Malhar alarm Nashik Latest Marathi News)

यंदा ३२ पार्ट्या यात सहभागी झाल्या आहेत. रात्रभर होणाऱ्या या सादरीकरणात दरम्यान या वाघ्या मुरळीच्या चहापान आणि पाहुणचाराची व्यवस्था ग्रामस्थांतर्फे केली जाते. प्रभाग ३१ चे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या हस्ते या सादरीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. एकनाथ नवले, राजू जुन्नरे, बाळकृष्ण शिरसाट आदींची प्रमुख उपस्थिती होती. यंदा नाशिकमधीलच गंगूबाई लगड आणि सहकाऱ्यांना प्रथम सादरीकरणाचा मान देण्यात आला. नाशिक परिसरासह थेट कोपरगावपासून वाघ्या मुरळ्याच्या पार्ट्या यात सहभागी झाल्या.

पहाटे पाचपर्यंत अखंड हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालतो. या पार्ट्या खंडोबाची गाणी भारुडे आदी बाबींचे सादरीकरण करतात. चंपाषष्ठीनिमित्त होणाऱ्या खंडोबाच्या यात्रेला वाघ्या मुरळी हमखास जेजुरी येथे जातात. त्यामुळे भैरवनाथ जयंतीला वाघ्या मुरळीच्या या पार्ट्या खंडोबाचा यात्रोत्सव जागरण गोंधळाने साजरा करण्याची परंपरा पाथर्डी गावात जपली जात आहे. येथील खंडेराव मंदिराच्या प्रांगणात हा उत्सव रंगला. पाथर्डीसह, पिंपळगाव खांब, दाढेगाव, वडनेर, विहीतगाव, नाशिक रोड, गौळाणे आदी भागातून ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी अर्जुन हुल्लूळे, नितीन लोन, रामदास जाचक, बाजीराव नवले, एमके अण्णा कोंबडे, संजय जाचक, नारायण वाजे, अरुण डेमसे, बंडू मोरे, खंडू चव्हाण, सोमनाथ शिरसाट ही वाघेमंडळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, दोनवेळा भूषवलेलं मुख्यमंत्रीपद

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात भाजपमध्ये होणार मोठं इन्कमिंग, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

SCROLL FOR NEXT