Elections esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Elections : अंदाजपत्रकाची उडी अडीच हजार कोटी पार; आचारसंहिता पूर्वीच मंजुरीसाठी धावपळ

शहर विकासाची दिशा ठरविणाऱ्या आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींचा टप्पा गाठणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Elections : शहर विकासाची दिशा ठरविणाऱ्या आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक अडीच हजार कोटींचा टप्पा गाठणार आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून त्यापूर्वीच अंदाजपत्रक मंजुरी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. (jump in budget is two and half thousand crores nashik lok sabha election news)

त्याचाच एक भाग म्हणून सुट्टीच्या दिवशीही विभागांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी आचारसंहिता लागू होणार असल्याने २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मागील वर्षी दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते.

यावर्षी अडीच हजार कोटींच्या वर अंदाजपत्रक पोहचेल असा अंदाज आहे. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत कामांची यादी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नगर नियोजन, मिळकत व बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास विलंब झाला. त्यामुळे जानेवारी महिन्यात सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याची वेळ लेखाविभागावर आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन बैठका सुरू आहे.

प्रशासनाची धावपळ

एकीकडे बैठका तर दुसरीकडे अंदाजपत्रक सादर करावे लागणार असल्याने व त्यातही लोकसभा निवडणुकीचे आचार संहिता लागू झाल्यास तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने २० फेब्रुवारीच्या आत अंदाजपत्रक मंजूर करण्याची घाई सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर आता शनिवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. खाते प्रमुखांना या बैठकीत पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून खर्चाची आकडेवारी घेऊन मूळ अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

तीन हजार कोटींची शक्यता

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार ४७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी कर विभागाने मोठ्या प्रमाणात कर वसुली केल्याने तसेच शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटी अनुदानामध्ये आठ ते दहा टक्के वाढ होणार असल्याने अंदाजपत्रकात पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांच्या वर अंदाजपत्रक पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT