pigeons.jpg 
नाशिक

सिमेंटच्या जंगलात 'पारव्याची जोडी' घुमे गुटर्रघुम...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येसगाव) पारव्याची जोडी घुमे गुटर्रघुम असे मराठी सिनेगीत आहे. पारवा म्हणजेच कबुतरांची ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील सिमेंट कॉंक्रिटची जंगले कबुतरांसाठी वरदान ठरत आहेत.

कबुतरांचे थवे धान्यावर ताव...
 
उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यातही या पक्ष्यांना चारा-पाण्यासाठी खास अशी भटकंती करावी लागत नाही. शहरातील उंच इमारती व मोठमोठी झाडे यांच्या सहाय्याने पक्षी आपले बस्तान बसवितात. कबुतरे सहसा झाडावर घरटी करत नसल्यामुळे इमारतीं वरील फलकांमागे, तसेच बिल्डिंगच्या लहान कप्प्यांमध्ये बाहेरील ठिकाणी काड्याकुड्यांचे घरटे करून अंडी घालतात. ग्रामीण भागात उंच इमारती नसतात. त्यामुळे शहरी भाग त्यांना सुरक्षित वाटतो. त्यांची शिकार शहरी भागात केली जात नाही. उन्हाळा म्हटला म्हणजे महिला धान्य वर्षभर टिकावे यासाठी गहू, बाजरी, ज्वारी आदी प्रकारचे धान्य यांना ऊन दाखवितात. कीड लागू नये म्हणून वरच्या शेवटच्या मजल्यावर धान्य पसरवितात. अशा ठिकाणी कबुतरांचे थवे धान्यावर ताव मारतात. 

कबूतरखान्यातील कबुतरांची संख्या लक्षणीय

शहरी भागात वर्षभर नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू असल्याने स्लॅबच्या मजबुतीसाठी त्यावर पाण्याचा साठा करतात. यामुळे आपोआपच कबुतरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटतो. सध्या शेतांमध्ये गव्हाची कापणी सुरू आहे. अशा वेळेस जंगलात कबुतरांचे थवे गव्हाचे दाणे, खडे टिपण्यासाठी येतात. मात्र, सायंकाळी शहरी भागात थवे परततांना दिसतात. पाण्याच्या टाक्‍या, झाडी, उंच इमारती येथे नेहमी कबुतरांचे थवे दिसून येतात. महानगरांमध्ये कबुतरांसाठी अनेक जण धान्य टाकतात, त्यामुळे कबुतरांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.

प्रसंगी डोकेदुखी ठरणार

शांतिदूत म्हणून कबुतरांची ओळख आहे. भविष्यात कबूतरखान्यातील कबुतरांची संख्या लक्षणीय आहे. प्रसंगी डोकेदुखी ठरणारे होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. सरासरी पाळीव व जंगली कबुतरांच्या तीनशे जाती आहेत. एखाद्या वेळेस "कबुतर जाऽ जाऽ जाऽ' म्हणण्याची वेळ येऊ शकेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT