नाशिक

भंगार बाजारातील गाळेधारकांचे न्यायालयीन प्रयत्न निष्फळ

CD
टुडे १ मेन फिचर ---- (न्यायालयाचे चिन्ह वापरावे) --- भंगार बाजारातील गाळेधारकांची याचिका फेटाळली न्यायालयीन प्रयत्न निष्फळ; जागा ताबा घेण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३० : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या अजिंठा चौफुलीजवळ महापालिकेच्या जागेवर भंगार बाजार अनेक वर्षांपासून होता. या जागेचा ताबा मिळविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाले असून, या जागेवरील निष्कासनाच्या कारवाईला विरोध करणाऱ्या व्यावसायिकांना जिल्हा न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकलेला नाही. २०२१ मधील निष्कासन आदेशाला तब्बल पाच वर्षांनी आव्हान दिल्याचे कारण पुढे करीत न्यायालयाने २९ ऑक्टोबरला दाखल अपील फेटाळले. त्यामुळे महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्याचा आता कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. तत्कालीन नगरपालिकेने सीटी सर्व्हे नं. २९ या जागेवर भंगार व्यावसायिकांना नऊ वर्षांच्या कराराने ही जागा दिली होती. मुदत संपल्यानंतर महापालिकेने संबंधित ठराव रद्द करून अधिनियमातील कलम ८१ नुसार प्रक्रिया राबविली. २०२१ मध्ये जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही जागेचा ताबा सोडण्यास भंगार व्यवसायिकांकडून विरोध सुरू होता. मुदतवाढ नाकारली याप्रकरणी काही जागाधारकांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला. इब्राहिम पटेल यांनी २०२३ मध्ये भाडेकरू घोषित करण्यासाठी दावा दाखल केला. दुसरीकडे, महापालिकेने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. त्याविरोधात असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली. चौकट जिल्हा न्यायालयाने याचिका फेटाळली त्यानंतर ११५ भंगार व्यावसायिकांपैकी २५ व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने सुरुवातीला स्थगिती दिली होती. मात्र, निष्कासन आदेशाला आव्हान देण्यास झालेला पाच वर्षांचा विलंब माफ करण्यास नकार देत अपील फेटाळले. तसेच अपीलकर्त्यांकडून जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत भंगार व्यवसायिकांकडून वचननामा (अंडरटेकिंग) लिहून घेतले आहे. चौकटीत काय आहे प्रकरण? - तत्कालीन नगरपालिकेने ९ वर्षांसाठी जागा कराराने दिली. - २०२१ मध्ये मनपाने निष्कासनाचे आदेश दिले. - ३० सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात. न्यायालयीन घडामोडी - १४ ऑक्टोबरपर्यंत उच्च न्यायालयाची स्थगिती. - जिल्हा न्यायालयाची २८ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती. - २९ ऑक्टोबरला विलंब माफी नाकारून अपील फेटाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाल्कनीत फुले तोडायला गेला, अचानक पाय घसरून...; बापलेकाचा 23 व्या मजल्यावरून पडून करुण अंत

What Hardik Pandya do now? रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिक Mumbai Indians कडून खेळणार का? ऑलराऊंडर काय म्हणाला ते वाचा

Gold-Silver Investment: सोनं की चांदी? 1:76 च्या रेशोमुळे कशात गुंतवणुकीची संधी? तज्ज्ञांनी सांगितला फॉर्म्युला!

Marathi News Live Updates : दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा दिलासा; सुका चारा आणि मुरघासाचे दर निश्चित

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळून एक मजूर ठार, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT