नाशिक

बायपास बंद काळातील मृत्यूंना न्याय मिळालाच पाहिजे!

CD
NSK26H31839 जळगाव : महासभेत बोलताना अरविंद देशमुख. --- ‘बायपास’ बंद काळातील मृत्यूंना न्याय मिळालाच पाहिजे! उपशीर्षक महासभेत अरविंद देशमुख यांची आग्रही मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : जळगाव शहराबाहेरून जाणारा पाळधी-तरसोद बायपास रस्ता महिन्याहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. बायपास बंद असताना झालेल्या अपघातांमुळे जे निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय आणि नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी आज जळगाव महापालिकेच्या महासभेत केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील या बायपास रस्त्याच्या बंदीमुळे जळगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि रहदारीच्या ठिकाणी जड वाहनांची वर्दळ वाढली. त्यातून अपघातांची संख्या वाढली आणि या अपघातांमध्ये सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा देशमुख यांनी सभागृहात ठामपणे मांडला. त्यांनी स्पष्ट केले की, रस्ता आज सुरू झाला म्हणून बायपास बंद काळातील मृत्यूंचा प्रश्न संपत नाही. त्या काळातील निष्काळजीपणा, चुकीचे नियोजन आणि नागरिकांच्या जीविताशी झालेला खेळ याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी आक्रमकपणे मांडली. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT