नाशिक

शिरपूर : राजपूत समाज निवेदन बातमी

CD
SHC26B13459 शिरपूर : प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना पदाधिकारी. --------- ज्ञानेश्‍वर मोरे हत्येप्रकरणी कठोर कारवाई करा शिरपूरला राजपूत समाजाचे प्रशासनाला निवेदन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ७ : जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे २६ सप्टेंबरला झालेल्या ज्ञानेश्वर उत्तमसिंग मोरे यांच्या हत्या प्रकरणाची निष्पक्ष व जलद चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था आणि माँ राणी पद्मिनी महिला मंडळाने बुधवारी (ता. ७) प्रशासनाकडे केली. समाजाच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. कुंभारी येथे किरकोळ वादातून मोरे यांची हत्या झाली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला असून, समाजातही असंतोष निर्माण झाला आहे. घटनेनंतर मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोरे यांच्या मुलाला मारहाण झाली. या प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला संरक्षण मिळू नये, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी करून तिची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंह सिसोदिया, नरेंद्रसिंह सिसोदिया, शिवसेनेचे राजू टेलर, भरतसिंह राजपूत, निवृत्त पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह राजपूत, देवेंद्र राजपूत, नितीन राजपूत, महेंद्रसिंह गिरासे, राजेंद्र राजपूत, ॲड. प्रविणसिंह पाटील, नगरसेवक राज सिसोदिया, डॉ. योगेश जाधव, विजय गिरासे, माँ राणी पद्मिनी महिला करणी सेनेच्या जया गिरासे, ममता सिसोदिया, अश्विनी राजपूत, सरिता राजपूत, प्रविणा गिरासे, डॉ. अश्विनी राजपूत, चंद्रमा राजपूत आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांचा सन्मान

Karnataka Elections : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी जिल्हा-तालुका पंचायतींचा रणसंग्राम; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता; डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू?

SCROLL FOR NEXT