नाशिक

निष्कलंकी धाममध्ये आज कल्की भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

CD
NSK26H34151 जळगाव : कल्की भगवान मूर्तीची मंत्रोपचारात महाभिषेक करताना. ....... निष्कलंकी धाममध्ये आज कल्की भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रोपचारात महाभिषेक विधी उत्साहात; संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञपूर्णाहुती, महाप्रसाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शिव कॉलनी परिसरातील सतपंथ ज्योत मंदिर श्री निष्कलंकी धामच्या १७ व्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री निष्कलंकी नारायण (कल्की भगवान) मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव धार्मिक वातावरणात सुरू आहे. महोत्सवांतर्गत यज्ञाचार्य डॉ. श्रीकांत रत्नपारखी महाराज यांच्या वेदोक्त मंत्रोपचारात भगवंताच्या मूर्तीचा महाभिषेक आणि धान्याधिवास विधी भक्तिभावाने पार पडला. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, संत विजय प्रकाश महाराज यांच्यासह संत-महंतांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले. महोत्सवाचा मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी (ता. १ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. जयपूर येथील मकराना येथून आणलेल्या साडेतीन फूट उंचीच्या कल्की भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूज्य संतांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास सतपंथ पीठाचे जगद्गुरू सत्पंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदेवाचार्य महाराज (अहमदाबाद), संत गोपाल चैतन्य महाराज (वृंदावन), महामंडलेश्वर पवनकुमारदास महाराज, स्वामी उदयगीरी महाराज, स्वामी आत्मारामानंद, महंत दीपकदास महाराज यांच्यासह विविध ठिकाणांहून संत-महंत उपस्थित राहणार आहेत. तसेच यज्ञाचार्य डॉ. श्रीकांत रत्नपारखी आणि आचार्य डॉ. सचिन पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री निष्कलंकी धामच्या वतीने करण्यात आले आहे. चौकट अशी आहे कार्यक्रम रूपरेषा रविवार (ता.१) रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण, तर ९ वाजता श्री निष्कलंकी नारायण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि यज्ञपूर्णाहुती होईल. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धर्मसभा, संतमेलन, विशेष सन्मान, गोदान आणि वास्तुदान संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

Numerology Personality Prediction : समोर बोलतात खूप गोड, पण डोक्यात चाललेला असतो वेगळाच गेम! 'या' जन्मतारखांचे लोक असतात भलतेच चलाख; ओळखणे अशक्य

Marathi News Live Updates : 'नॅफ्स्कॉब'च्या संचालकपदी ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला

SCROLL FOR NEXT