टुडे ४ मेन फिचर
---
लोगो : नव्या वस्त्या; जुन्याच समस्या (हा लोगो १४ ऑक्टोबरच्या शहर टुडे ४ वरून घ्यावा)
NSK26H32651
जळगाव : रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा.
-------------
NSK26H32653
परिसरातील मोकळ्या जागेत वाढलेले गवत.
--
NSK26H32654
काळे नगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था.
------------
NSK26H32655
परिसरातील तुंबलेली गटारी.
----------
काळेनगर परिसर समस्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त
पथदीप बंद; स्वच्छतेकडे दुर्लक्ष, खुल्या भूखंडांतील गवतामुळे आरोग्याचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१६ : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा अभाव जाणवत असताना काळे नगरातील रहिवाशांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील पथदिव्यांचा अभाव, गटारींची अनियमित स्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांची अनियमितता आणि खुल्या भूखंडांमध्ये वाढलेले गवत यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिका प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
काळे नगरातील पथदिव्यांची समस्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्यास रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील बंद असलेले पथदिवे सुरू करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसविणे गरजेचे आहे.
स्वच्छतेचा प्रश्न कायम
परिसरातील गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याची समस्या पुढे येत आहे. गटारींमध्ये साचणारा कचरा आणि सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यास दुर्गंधी पसरून परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. पावसाळ्यात तसेच पावसाळ्यानंतर गटारींची योग्य प्रकारे स्वच्छता करणे आवश्यक असते. मात्र, स्वच्छतेचे काम नियमितपणे होत नसल्यास नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
सफाई कर्मचाऱ्यांचा अभाव
परिसरात साफसफाई नियमित होत नसल्याने रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये कचरा साचण्याची शक्यता निर्माण होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजात नियमितता राहावी, यासाठी महापालिकेने संबंधित यंत्रणेकडून पाहणी करणे आवश्यक आहे. काळे नगरातील खुल्या भूखंडांमध्ये गवत आणि झुडपे वाढल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा जागांमध्ये प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू साचल्यास डासांची उत्पत्ती होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
चौकट
नागरी सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
शहराचा विस्तार होत असताना वाढीव वस्त्यांमधील मूलभूत नागरी सुविधांकडेही समान लक्ष देणे आवश्यक आहे. रस्ते, पथदिवे, गटारी आणि नियमित स्वच्छता या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित बाबी आहेत. काळे नगरातील समस्यांची पाहणी करून महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना द्याव्यात. पथदिवे दुरुस्त करणे, गटारींची नियमित स्वच्छता करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि खुल्या भूखंडांतील वाढलेले गवत काढणे, अशा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.
कोट
पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून ये-जा करताना अडचणी येतात. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. गवत वाढल्याने मच्छर खुप होतात यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. महापालिकेने या भागात लक्ष देवून समस्या सोडवाव्यात.
- पंकज नेवे, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.