नाशिक

काळगाव येथे फलज्योतिष, बुवाबाजी विरोधी ग्राम परिषद

CD
(पान ४ ला ॲंकर) MSI26B09844 काळगाव : फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी ग्राम परिषदेत मार्गदर्शन करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे. ------------------- लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा संजय बनसोडे : काळगाव येथे फलज्योतिष, बुवाबाजी विरोधी ग्राम परिषद सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ९ : महाराष्ट्र ही संत व सुधारकांची भूमी आहे. बाराव्या शतकापासून ते अलिकडच्या संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत येथील संत परंपरेने जातीव्यवस्थेवर प्रहार केले. महिलांना समानतेची वागणूक दिली, मानवतेचा पुरस्कार केला. महात्मा फुलेंचे हे दोनशेवे जयंती वर्ष आहे. ज्योतिबांनी धर्माची कठोर चिकित्सा करत त्यातील अमानवीय रुढी- परंपरांविरुद्ध संघर्ष केला. पण त्याच महाराष्ट्रात आज पुन्हा भोंदू बुवा- बाबांचा सुळसुळाट झाला आहे. यापासून दूर राहण्यासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केली. काळगाव (ता. साक्री) येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी ग्राम परिषदेचे नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. खगोल विज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे, समितीचे राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे, राज्य कार्यवाह प्रा. परेश शाह उपस्थित होते. डॉ. नितीन शिंदे यांनी शनीची साडेसाती, कडक मंगळ, कालसर्प योग व नारायण नागबळी, वास्तुशास्त्र यातील फोलपणा व अशास्त्रीयता स्पष्ट केली. प्रा. परेश शाह यांनी साक्री तालुक्याची सत्यशोधकी विचारांची परंपरा व स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकला. परिषदेला ककाणी ज्येष्ठ वारकरी दिगंबर बेडसे, निंबा बेडसे, कैलास ठाकरे, जिल्हा प्रधान सचिव प्रा. संदीप गिरासे, प्रा. रणजित शिंदे, नितीन बागूल उपस्थित होते. परिषदेचे निमंत्रक नवल ठाकरे आयोजक होते. प्रा. बोरसे व रणजित शिंदे यांनी चमत्काराचे प्रयोग दाखवून जनजागृती केली. श्‍वेता गवळे या युवतीने प्रबोधनाची गाणी सादर केली. परिषदेदरम्यान वीजपुरवठा नसल्यामुळे प्रोजेक्टरचा उपयोग करता आला नाही व अंधारातच कार्यक्रम करावा लागला. त्यामुळे वीजवितरण कंपनीवर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. ग्रामस्थ लोटन ठाकरे, विनायक ठाकरे, अनिल बेडसे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, भास्कर ठाकरे, केशव ठाकरे, बालुकाका खैरनार, नरेंद्र ठाकरे, विश्वास ठाकरे, महेश ठाकरे, पोलिसपाटील गणेश देसले, नंदकुनमार खैरनार, रवींद्र खैरनार, मामा कापडणीस, अमोल खैरनार, पंडीत खैरनार, क्रांती ठाकरे, हेमंत ठाकरे उपस्थित होते. जयेश ठाकरे, अविनाश ठाकरे, विशाल सोनवणे, कांतिलाल अहिरे, दादु ठाकरे आदींनी परिश्रम घेतले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire Alert: पुणेकरांचा निष्काळजीपणा भोवला; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या घटनांचा उच्चांक! ९४ ठिकाणी अग्नितांडव

मला कळत होतं हा जेलस आहे... आमिर खानच्या छोट्या भावाबद्दल वर्षा उसगावकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या-तावातावत बोलून...

दिवाळीच्या रात्री नागपुरात रक्तरंजित थरार! फटाके फोडण्यावरून वाद, चार जणांनी तरुणाला संपवलं

Viral Video : चेकिंगदरम्यान पोलिसाने इन्फ्लुएंसरकडे मागितले दिवाळी गिफ्ट, VIDEO VIRAL; लोक म्हणाले- ही तर खुलेआम लूट

Maharashtra Live News: चिखलीतील आरंभ हॉटेल परिसरात झाडी-झुडपात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

SCROLL FOR NEXT