एन्कर
यात्रोत्सवासाठी महामार्ग बसस्थानकात वाहनतळाचे नियोजन
श्री कालिका देवी यात्रोत्सव; वाहतूक शाखेकडून नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : रविवार (ता. ११) पासून श्री कालिका देवी यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेने वाहतूक कोंडीसह पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी नियोजनाची आखणी केली आहे. रुची हॉटेल ते गडकरी सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल तर, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहन पार्किंगसाठी महामार्ग बसस्थानकासह अन्य पर्यायी ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
श्री कालिका देवीचा यात्रेसाठी नाशिकसह पंचक्रोशीतून भाविक देवीच्या दर्शनासह यात्रोत्सवासाठी येतात. त्यामुळे जुना आग्रा महामार्गावरील महामार्ग बसस्थानक परिसरातील रुची हॉटेल ते गडकरी सिग्नल रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. या रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी दुकाने थाटलेले असते. तर दररोज लाखो भाविक मंदिरात व यात्रोत्सवात येतात. भाविकांना वाहने पार्क करण्यासाठी या वेळी जागेची अडचण आहे. सिंहस्थामुळे अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक वळविलेली आहे. तर पंचवटी व बाजारपेठेकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असलेला जुना आग्रा रोडवरही नवरात्रोत्सवात बंद राहणार आहे. रुची हॉटेलकडून सुयश हॉस्पिटलमार्गे चांडक सर्कलकडे जाणारा रस्ता पर्यायी मार्ग असल्याने यावेळी या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मनाई केली जाणार आहे.
----चौकट
पे ॲन्ड पार्कची सुविधा
- नाशिक रोड, सिडको, इंदिरानगर या परिसरातून देवीचे दर्शन व यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी महामार्ग बसस्थानकात पे ॲन्ड पार्कची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेने परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे पाठपुरावा केला आहे.
- चांडक सर्कल ते संदीप हॉटेल हा मार्गही वाहतूकीसाठी बंद असेल. या रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहनतळाचे नियोजन आहे. तसेच, महामार्गासमोरील खाऊगल्लीतही दुचाकी वाहनतळाचे नियोजन आहे. त्यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे.
- गडकरी सिग्नलकडून शिंगाडा तलावाकडे जाणारा रस्त्यालगत वाहने पार्क करण्याबाबतचा पर्यायाचा शहर वाहतूक शाखेच्या विचाराधीन आहे.
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहने पार्क केल्यास जागेवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
----कोट
फोटो: H31630
श्री कालिका देवी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या वाहनांच्या पार्किगसाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी अधिक शिस्तबद्धपणे वाहनतळाचे नियोजन केले आहे. भाविकांनीही नियमांचे पालन करीत सहकार्य करावे.
- पंकज भालेराव, वरिष्ठ निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, मुंबई नाका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.