नाशिक

कालिका माता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा पाच कोटीचा विमा

CD
फोटो : A14973 नाशिक : ग्रामदेवता कालिकामाता. --- कालिकामाता भक्तांचा पाच कोटीचा विमा यात्रोत्सवाची तयारी; महिला- पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ९ : नवरात्रोत्सवानिमित्त कालिकामाता मंदिरात विश्वस्तांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाविकांना सुरळीत आणि शांततेत दर्शन घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता त्यांचा पाच कोटीचा विमा असणार आहे, अशी माहिती कालिकादेवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी दिली. रविवारी (ता.११) नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यंदाही भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. भाविकांच्या सुरक्षेतेची विशेष काळजी घेत यंदा भाविकांचा पाच कोटीचा विमा उतरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देवीच्या दागिन्यांचादेखील दोन कोटीचा सात कोटीचा विमा कवच मंदिराचा असणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत असणार आहे. यासाठी विविध भागात सुमारे ५५ सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तासह संस्थानाकडून ३० पुरुष आणि २० महिला बाउन्सरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह होमगार्ड आणि स्वयंसेवकही असणार आहेत. २४ तास भाविकांसाठी मंदिर खुले असणार आहे. एका तासात सुमारे पाच हजार भाविक दर्शन घेऊ शकतील. परतीचा पाऊस लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप मंदिर परिसरात उभारण्यात येणार आहे. रात्री बारा वाजता महाआरती तर पहाटे साडेतीन वाजता काकड आरतीचे आयोजन असणार आहे. ---चौकट यंदाचे आकर्षण देवी मंदिरासमोर यंदा १११ किलो पंचधातूचा ९ फूट उंच त्रिशूल उभारण्यात येणार आहे. सुमारे सव्वा तीन लाखांच्या खर्चातून त्रिशूल तयार करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये देवी दर्शनासह प्रथमच उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य त्रिशूलाचे विशेष आकर्षण असणार आहे. --कोट फोटो : A14971 सकाळी चार वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सकाळी सात वाजता महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी आठ वाजता महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते पूजा होणार आहे. भाविकांना सुरक्षित दर्शन घेता यावे. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. - केशवअण्णा पाटील, अध्यक्ष, कालिकादेवी मंदिर संस्थान ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT