पंधरा दिवसांपासून कळवणला अघोषित भारनियमन
-----------------------------------------
ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर आंदोलनाची वेळ
सकाळ वृत्तसेवा
कळवण ता.२३ ः कळवण शहरात पंधरा दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर विजेचा सुरू असलेला लपंडाव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कळवण शहरातील गणेशनगर, मेनरोड शिवाजीनगर, शाहीर लेन अदिसह परिसरात वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सणासुदीत
वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
कोट
ऐन सणासुदीच्या काळात सायंकाळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत. महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या प्रश्नात लक्ष घालावे. अन्यथा शिवसेनच्या स्टाईलने आंदोलन करणार.
अजय पगार, शहरप्रमुख, शिवसेना, कळवण
“सणासुदीच्या खरेदीसाठी सायंकाळी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते. नेमक्या त्याच वेळी वीज खंडित होत असल्याने व्यापारावरही परिणाम होत आहे. महावितरणने सायंकाळच्या वेळेत अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.”
हेमंत कोठावदे- सदस्य, कळवण व्यापारी महासंघ
पावसाच्या कमतरतेमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे विजेची मागणी आणि पुरवठ्यात तफावत वाढत आहे. अचानक विजेची मागणी वाढल्याने ग्रीडची फ्रिक्वेन्सी कमी होते. ग्रीड सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंचलित प्रणालीद्वारे काही भागातील वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करावा लागतो.
- ए. टी. भोळे ( शहर अभियंता महावितरण कळवण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.