नाशिक

लॉन टेनिसमध्ये कमलाबाईचे यश

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो- NSK26H34626 धुळे : जिल्हा व मनपास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या कमलाबाई शाळेच्या संघांसोबत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षिका-शिक्षक. --- लॉन टेनिसमध्ये कमलाबाई शाळेचे वर्चस्व --- १४, १७ व १९ वर्षांखालील तिन्ही गटांत विजेतेपदावर मोहोर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित जिल्हा व मनपास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या तिन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावत शाळेने दिमाखदार कामगिरीची नोंद केली. स्पर्धेत कमलाबाई कन्या शाळेच्या खेळाडूंनी अचूक सर्व्हिस, वेगवान फटके, उत्कृष्ट कोर्ट कव्हरेज आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिन्ही वयोगटांत मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. १४ वर्षाखालील गटात चैताली फुलदेवरे, आरोही रामराजे, दुर्वा लाडे आणि प्राप्ती अहिरे यांनी विजेतेपद मिळविले. १७ वर्षाखालील गटात दिव्या सरोदे, राजेश्वरी जगताप, जयश्री धुर्वे, क्षितीजा लाडे आणि कीर्ती पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करत बाजी मारली. तर १९ वर्षाखालील गटात नेहा दुसे, पल्लवी मराठे, वर्षा गोपाळ, लावण्या कंड्रे आणि देवयानी मराठे यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले. खेळाडूंना क्रीडा शिक्षिका मनीषा पवार, सुनंदा मोरे व महेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. यू. नाबरिया, सचिव शिल्पा म्हसकर, शाळेच्या प्राचार्या छाया नाईक, उपमुख्याध्यापिका वंदना खैरनार, पर्यवेक्षिका अरुणा सोनवणे आणि मनिषा पवार, अरूंधती ब्रम्हे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT