Scenes from the play 'Pala Pala Ko Adi Pal Ato'.
Scenes from the play 'Pala Pala Ko Adi Pal Ato'. esakal
नाशिक

Kamgar kalyan Natya Spardha : सुख- दुःखांचा पाठलाग ‘पळा पळा कोण पुढे पळतो’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुख- दुःखांचा पाठलाग करताना होणारी पळापळ अन् त्यात रंजकदार होणारे आयुष्य याचा मेळ साधणारी नाट्यकृती म्हणजे ‘पळा पळा कोण पुढे पळतो’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत बुधवारी (ता. ११) कामगार कल्याण केंद्र चितोड रोड, धुळेतर्फे हे नाटक सादर झाले. बबन प्रभू लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मुकेश काळे यांनी केले. (Kamgar kalyan Natya Spardha Chasing joys and sorrows pala pala kon pudhe palato nashik news)

एका गावातील प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न पंडित बिंदू माधव शास्त्री याच्या घरात ही पळापळ होते. बिंदू माधव शास्त्री यांची पत्नी प्रमोदिनी आधुनिक जगात रमणारी आहे. प्रमोदिनी हिचा मित्र बन्सी अचानक तिच्या आयुष्यात येतो, जो गावामध्ये मिलिटरी कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांचा पाठलाग करत असतो.

दुसरीकडे चारूबाला नावाची एक समाजसेविका बिंदूच्या प्रेमात असते. एकदा चारुबाला बेशुद्ध पडते. प्रमोदिनी आणि बन्सी तिला घरातील एका मोठ्या कपाटात लपवतात. बिंदूला एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी प्रमोदिनीचे काका पंडित गागा शास्त्री येतात. अशातच मिलिटरीच्या तावडीतून सुटलेला नक्षलवादी बिंदूच्या घरात लपून बसतो.

त्यात बिंदू घरात प्रवचनासाठी एका पंडिताला आमंत्रित करतो. अशी अनेक विचारांची मंडळी या घरात एकत्र होतात. यात गंमत म्हणजे या सगळ्यांची वेशभूषा सारखी असते आणि यांचा एकमेकांपासून लपण्याचा प्रयत्न सुरू असतो. एका गमतीदार प्रसंगातून नक्षलवादी पकडला जातो, यासह ही धावपळ थांबते.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

प्रांजल सोनवणे, ऋतुजा घाटगे, केतकी कुलकर्णी, संदीप पाचंगे, राम वाणी, नितीन साळुंके, शुभम बागूल, गौरव आचारी, प्रतीक पाटील, शशिकांत अहिरे, मिलिंद सोनवणे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य प्रतीक वाघ, योगेश गोवर्धने, भूषण महाले, गौरव आचारी यांनी तर प्रकाशयोजना आकर्ष ललवाणी यांनी साकारली.

जय खोरे, ऋतुजा घाटगे यांनी ध्वनी संकलन तर ऋतिका देशमुख यांनी संगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा माणिक कानडे, तर वेशभूषा वैशाली शिंदे यांनी साकारल्या. मनोज गुळवे, नचिकेत दीक्षित, मोनाली पाटील, तनया भालेराव यांनी रंगमंच साहाय्य केले. राजू थोरात या नाटकाचे निर्मितीप्रमुख तर आदिल नूर शेख यांनी सूत्रधार म्हणून काम पाहिले. गुंजन धांडे यांनी दिग्दर्शन साहाय्य केले.

आजचे नाटक

स्पर्धेत गुरुवारी (ता. १२) कामगार कल्याण केंद्र, ओझरतर्फे ‘क्रकचबंध’ हे नाटक सादर होणार आहे. शिरीष जोशी या नाटकाचे लेखक असून दीपक टावरे दिग्दर्शक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT