Navratri  sakal
नाशिक

Navratri Festival 2023 : विद्या, धन, संपत्ती अन प्रतिष्ठा देणारे काम्य व्रत!

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाची गुरुवारी (ता. १९) पाचवी माळ. अर्थात, अश्‍विन शुद्ध पंचमीला विद्या, धन, संपत्ती, प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ललिता पंचमी तथा काम्य व्रत केले जाते.

खानदेशातील चक्रपूजेला सुरवात होईल. त्याचबरोबर शनिवारी (ता. २१) सप्तमीला महालक्ष्मी, महासरस्वती पूजन करीत शक्तिदेवतेपुढे श्‍वसनाचा मार्ग शुद्ध करणारा घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होईल. ललिता पंचमी तथा काम्य व्रतानिमित्त महिलांप्रमाणे पुरुष सकाळी उठून स्नान केल्यावर ध्यान करतात. (Kamya vrata lalita panchami navratri nashik news)

नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।

भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।

अर्थात, कमळावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो, असा ध्यानमंत्र म्हटला जातो. त्यानंतर व्रत पाळण्यास सुरवात होते. श्री गणेश, शंभू शिवशंकर आणि पार्वती मातेची व नंतर ललिता देवीची पूजा केली जाते. त्याचवेळी सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितला जातो. पंचांगानुसार पंचमीची तिथी गुरुवारी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल.

त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे ललिता पंचमीच्या व्रताचा उपवास गुरुवारी करता येईल, असे धर्मशास्त्र अभ्यासकांनी सांगितले. काम्य व्रतासाठी करंडकाचे झाकण प्रतीक म्हणून पूजेसाठी घेतले जाते.

काही घरांमधून केळीचे खांब आणि फुलांच्या माळांचे मखर देवीसाठी केले जाते. मंत्र पुष्पांजली झाल्यावर गंध-अक्षतांसह ४८ दूर्वा ललिता देवीला अर्पण केल्या जातात. लाडू, घारगे, वडे, खारी आदींचा नैवेद्य दाखविला जातो. रात्री जागरण आणि कथापठण व श्रवण करून दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

पौराणिक संदर्भ

राक्षसाचा वध करण्यासाठी ललिता देवी अवतरली. कामदेवाच्या राखेने राक्षस तयार झाला होता. यादिवशी शक्तिदेवीचे भाविक ललिता पूजा करतात. ललिता देवीसह स्कंद माता आणि शंभू महादेवाची पूजा केली जाते.

पौराणिक संदर्भ हा असून, देवीच्या कृपाशीर्वादाने सुख-शांती मिळते. रोग आणि दुःख दूर होते. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला शुक्रवारी (ता. २०) योद्धा देवी कात्यायनीची पूजा-आराधना केली जाते.

पूर्व भारतात महाषष्ठी स्वरूपात साजरी करीत शारदीय दुर्गापूजेला सुरवात केली जाते. शनिवारी सातव्या माळेला अर्थात सप्तमीला महासप्तमी साजरी केली जाते. कालरात्रीला दुर्गा पूजा केली जाते. तसेच, विस्तव करून त्यावर धूप जाळत घागर उलटी केली जाते. त्यात धूर भरून घागर शक्तिदेवीपुढे फुंकत नृत्य केले जाते. वसा घेतलेल्या महिला किमान पाच वेळा घागर फुंकतात, अशी प्रथा आहे. शक्तिदेवीची आरतीरूपी आराधना केली जाते. शक्तिदेवीच्या दर्शनासाठी या निमित्ताने गर्दी उसळते.

दुर्गाष्टमीचे महालक्ष्मी व्रत

नवरात्रोत्सवात रविवारी (ता. २२) दुर्गाष्टमीला महालक्ष्मी व्रत केले जाते. चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा साकारली जाते. सोळा दोरे एकत्र केलेले आणि सोळा गाठी मारलेले शेजारी ठेवतात. महालक्ष्मीचे षोडशोपचाराने पूजन केले जाते. सोळा प्रकारच्या पत्री आणि फुले वाहण्यात येतात. आरतीसाठी पिठाचे दिवे केले जातात. दोऱ्यांचे पूजन करून ते डाव्या हाताच्या मनगटावर बांधले जातात. महालक्ष्मीच्या कथेचे पठण केले जाते.

तांदळाच्या पिठाचा मुखवटा करून प्रदोषकाळी काही घरांमध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते. सोमवारी (ता. २३) खंडेनवमी तथा महानवमीला शक्ती आणि संपत्ती प्राप्तीसाठी व्रत केले जाते. उद्यापनाप्रसंगी कुमारिका भोजन करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. मंगळवारी (ता. २४) अश्‍विन शुद्ध दशमीला विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन साजरे होते. शस्त्र-यंत्र पूजन केले जाते. नाशिकसह देशभर रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा पाळली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Anil Parab : कदमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, अनिल परब यांचे प्रत्युत्तर; त्यांची ‘नार्को’ चाचणी करावी

SCROLL FOR NEXT