Niphad: Crows picking grains in the Sangameshwar temple area here esakal
नाशिक

Nashik News : निफाडच्या संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात तरुणांची काकसेवा!

सकाळ वृतसेवा

निफाड : येथील विनता-कादवा नदीच्या संगमावरील संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात तीन वर्षांपासून अव्याहतपणे संगमेश्‍वर भक्त मंडळाचे स्वयंसेवक काकसेवा करताहेत. आश्‍चर्य वाटलं ना तुम्हाला? पण हो! रोज सकाळी आणि सायंकाळी स्वयंसेवकांनी हाक मारताच शेकडो कावळे दाणे टिपण्यासाठी इथे जमतात. सेवेच्या जोडीला कावळ्यांशी स्वयंसेवकांच्या जडलेल्या ऋणानुबंधाची येथे प्रचीती येते.

देवस्थानच्या परिसरात दशक्रिया विधी होतात. त्या वेळी पिंडाला कावळा शिवण्यासाठी शोकाकुल नातेवाइकांवर बऱ्याचदा प्रतीक्षा करण्याची वेळ येते. मात्र त्याचवेळी स्वच्छंदीपणे दाणे टिपण्यासाठी कावळ्यांची होणारी गर्दी समाज माध्यमांमध्ये ‘व्हायरल’ होत आहे. दरम्यान, निफाड शहर जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याचा भाग आहे.(Kanakasava of young people in the area of ​Sangameshwar Mahadev Temple of Niphad Nashik News)

याठिकाणी दर वर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पक्षी डेरेदाखल होतात. विनता-कादवा नदीच्या संगमावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील वृक्षराजीवर पक्ष्यांची मांदियाळी असते. कोरोना महामारीमधील ‘लॉकडाउन’मध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. माणसांच्या जगण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. अशावेळी पक्ष्यांचे काय? अशी गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

कोरोनाकाळात मंदिरे, दुकाने, घरेही बंद होती. अशा कठीण परिस्थितीत पक्ष्यांचे हाल पाहून संगमेश्वर देवस्थानच्या स्वयंसेवकांनी संगमेश्वर देवस्थान परिसरातील पक्ष्यांसाठी दाणापाण्याची व्यवस्था केली. इथे कावळ्यांची संख्या मोठी आहे. स्वयंसेवक दाणापाणी घेऊन येतात आणि ‘या- या’ अशा हाका मारण्यास सुरवात करतात, तेव्हा काही क्षणात कावळे जमा होण्यास सुरवात होते. स्वयंसेवकांनी व्यवस्था केलेले दाणे टिपण्यास सुरवात करतात.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

निसर्ग अन् माणसाचे शाश्‍वत नातं

सन्ति निरतं जीव-जगतां प्राण-दाने,

तरु-लतानां विविध-वर्गाः शं दधाने।

वन-गिरि-नदी-पशु-विहङ्गाः

रात्रि-दिन-ऋतु-शशि-पतङ्गाः,

सर्वमास्ते जन-हितार्थं संहतम्।

रक्षति प्रकृतिः सती

सौख्य-राशिं तन्वती

वन्य-सम्पद् रक्षणीया सन्ततम्।

शाश्‍वतम्, प्रकृति-मानव-सङ्गतम्।।

हा संस्कृत श्‍लोक आहे. अर्थात, वृक्षराजी जगाला जीवन देण्यात व्यस्त आहे. कल्याणासाठी सदैव सजग आहेत. जंगल, डोंगर, नद्या, पशू-पक्षी हे रात्रंदिवस बारमाही, सूर्य व चंद्रासोबत लोकहितासाठी आहेत. निसर्ग आपले रक्षण करतो आणि सुख देतो. म्हणून आपण वृक्षराजी आणि त्यावर अवलंबून असलेल्या जीवांचे संरक्षण केले पाहिजे. त्यातून मनुष्य आणि निसर्गातील शाश्‍वत नातं अबाधित राहील.

"निफाडच्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात असलेल्या वृक्षराजीवर मोठ्या संख्येने कावळ्यांची वस्ती आहे. कोरोनाकाळात कावळ्यांचे दाणापाण्यासाठी होत असलेले हाल पाहून आम्ही मित्रांनी कावळ्यांसाठी दाणापाण्याची सोय केली. तीन वर्षांपासून ती सुरू आहे. ‘या- या’ म्हटल्यानंतर शेकडो कावळे जमा होऊन कुटुंबाप्रमाणे अन्नाचे भक्षण करतात."

- किशोर परदेशी, पक्षीप्रेमी, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : आधी पराभव बघितले...आता इतिहास घडवण्याची वेळ; फायनलसाठी तयार हरमन ब्रिगेड, किती वाजता सुरु होईल सामना?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बनवणाऱ्या महेश मांजरेकरांना महाराजांबद्दल विचारले ४ प्रश्न; काय दिली उत्तरं? तुम्ही ठरवा योग्य की अयोग्य

Mumbai: महिलेचा स्कर्ट ओढणे आणि शिट्टी वाजवणे हा गुन्हाच...! मुंबईतील न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला सुनावली 'अशी' शिक्षा

Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

SCROLL FOR NEXT