नाशिक

महिलांनीमहिलांनी दिला सामाजिक संदेश दिला सामाजिक संदेश

CD
NSK26H31860 कानळदा (ता.जळगाव) : रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देताना सरपंच पुंडलिक सपकाळे. शेजारी भीकन सपकाळे आदी. ------------- रंगांद्वारे दिला सामाजिक संदेश ----- कानळदा येथील रांगोळी स्पर्धेत भावना सपकाळे प्रथम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.११ : सेवा संकल्प अभियान २०२६अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कानळदा येथील अंगणवाडीत प्रवेशित बालकांच्या मातांसाठी विशेष रांगोळी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. गावचे माजी सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत गावातील प्रशिक्षित महिलांपासून ते शेतकरी व शेतमजूर महिला, गृहिणींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. महिलांनी अल्पवेळेत कलात्मकतेचा सुरेख समन्वय साधत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. कानळदा ग्रामस्थ, सहभागी महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे सेवा सप्ताहातील हा उपक्रम महिलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक संदेश पोहोचविणारा ठरला. या स्पर्धेत भावना सपकाळे प्रथम, कल्याणी योगेश येवले व विद्या शुभम सपकाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सहभागी सर्व स्पर्धकांना पुंडलिक सपकाळे यांनी वैयक्तिक बक्षिसे देऊन स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला. भीकन सपकाळे, मयूर भदाणे, दिनेश सपकाळे, प्रल्हाद न्हावकर, जितेंद्र सपकाळे, अंगणवाडीसेविका, मदतनीस, महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन भारती शिंपी यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सपकाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT