नाशिक

कानळदारोडवर सुसाट कारची रिक्षाला धडक

CD
कानळदा रस्त्यावर कारची रिक्षाला धडक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : कार व मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षाचालक इब्राहीम रहीम पिंजारी (वय ३५, रा. उस्मानिया पार्क) यांना गंभीर दुखापत होण्यासह कारमधील दोन जखमी झाले. रिक्षाचालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. ३) कानळदा रस्त्यावर झाला. मालवाहू रिक्षाचालक इब्राहीम पिंजारी कानळदा येथे साहित्य पोहोचून जळगावकडे येत होते, तर जळगाव येथून राहुल रमेश पाटील (वय ३८, रा. वाल्मीकनगर) व चालक कारने किनोदला जात होते. कानळदा रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती, की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. रिक्षाचे चाक निखळण्यासह ती पूर्णपणे दाबली गेली. यात चालक इब्राहीम पिंजारी यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. कारमधील राहुल पाटील यांच्या डोक्याला, हात व पायाला मार लागला असून, कारचालकाही दुखापत झाली. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ! सणासुदीतही ग्राहकांचा ठेंगा; धक्कादायक कारण काय? सहा वर्षांत पहिल्यांदाच...

IND vs NZ 1st ODI Live : शुभमन गिलचा आत्मघातकी निर्णय? ५ फलंदाज, ४ जलदगती गोलंदाज अन् २ ऑलराऊंडरसह टीम मैदानात

IPL 2027 Trade : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना सूर्यकुमार यादवच्या ट्रेडचा 'बाऊन्सर' पडला; Mumbai Indians ने काय निर्णय घेतला?

Maharashtra Rain : दिवाळीला धोधो कोसळणार ! 'या' १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता, ‘मुरासू’ चक्रवादळही निवळणार

Vaibhav Sooryavanshi ला फक्त १५ व्या वर्षी उपकर्णधार करणे योग्य आहे? सचिन तेंडुलकरने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, 'खूपच घाई...'

SCROLL FOR NEXT