नाशिक

‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

CD
NSK26H33765 जळगाव : दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल संस्थेतर्फे ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा शो सादर करण्यात आला, त्याप्रसंगी उपस्थित अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासह यजुर्वेंद्र महाजन व मान्यवर. ---- ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद उपशीर्षक अभिनेता पिळगावकरांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल येथील २१० विद्यार्थ्यांना ‘कापूसकोंडा’ चित्रपट पाहण्याची विशेष संधी मिळाली. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विद्यार्थ्यांसोबत चित्रपटाचा आनंद घेतला. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन मोहिते, निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर, दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संचालक अनिल भोळे आणि डॉ. रुपेश पाटील उपस्थित होते. चित्रपटातील मुक्या प्राण्याप्रती असलेले प्रेम, संवेदना आणि भावनिक नात्याने विद्यार्थी भारावून गेले. अंध विद्यार्थ्यांना चित्रपटातील प्रसंग समजावून सांगण्याची, तर कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांशी संवाद सचिन पिळगावकर यांनी फाउंडेशनला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी एका प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनीने सादर केलेल्या सुरेल गीताने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना भेटून झालेला आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली. सचिन यांनी ‘ कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून मिळालेली संपूर्ण रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनसाठी समर्पित केली. हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारणारी ही संस्था खऱ्या अर्थाने ‘संवेदनशीलतेचे मंदिर’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT