नाशिक

पिंपळगांव बसवंत मर्चट्स को आॅप बॅकेच्या अध्यक्षपदी करसन ठक्कर बिनविरोध

CD
पान एक ॲंकर ------------------ 10341 पिंपळगाव बसवंत : पिंमकोच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करसनदास ठक्कर यांचा सत्कार करताना अशोक शाह, विजयराज बाफणा, संदीप सुराणा आदी. पिंमकोच्या अध्यक्षपदी करसन ठक्कर बिनविरोध नंदकिशोर जंगम उपाध्यक्ष, मानद कार्यकारी संचालकपदी महेश चांदवडकर सकाळ वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत, ता. १८ : नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य व्यापारी बॅक म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपळगाव मर्चटस बॅकेच्या अध्यक्षपदी करसनदास मुळजी ठक्कर यांची उपाध्यक्षपदी नंदकिशोर जंगम तर मानद कार्यकारी संचालकपदी महेश चांदवडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सलग पंचवीस वर्षापासून पिंमकोचे संचालक असलेले करसन ठक्कर यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपद भुषविण्याची संधी मिळाली आहे. ठक्कर, जंगम, चांदवडकर यांच्या रूपाने अनुभव व नवख्याचा संगम घालण्याचा प्रयत्न केला आहे. पिंमकोचे अध्यक्ष विजयराज बाफणा, उपाध्यक्ष संदीप सुराणा यांनी आवर्तन पद्धतीनसार राजीनामा दिल्याने पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा झाली. त्यात अध्यक्षपदासाठी करसन ठक्कर, उपाध्यक्षपदासाठी नंंदकिशोर जंगम तर मानद कार्यकारी संचालकपदासाठी महेश चांदवडकर यांचे प्रत्येकी एक अर्ज आले. तीनही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. वर्षभरावर निवडणुक असताना संचालक मंडळाने ठक्कर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली आहे.चांदवडकर यांना गत चार वर्षात दोनदा उपाध्यक्षपदाची संधी देताना पुन्हा मानद कार्यकारी संचालकपदावर वर्णी लागली आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांनी सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ संचालक अशोक शाह, विजयराज बाफणा, हिरालाल पगारिया, धनंजय गांगुर्डे, मनोहर पाटोळे, कालिदास खैरे, सुनंदाताई जैन, विद्याताई घोडके, हसमुख शाह, वर्धमान बुरड, कांतीलाल पटेल, डॉ.महेश बुब, प्रकाश गोसावी, संदीप सुराणा, डॉ.अभिनंद भंडारी, दिलीप सोमठाणकर, रोहीत मुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी भोजराज जैन उपस्थित होते. पिंमकोच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन संचालक मंडळाचा विश्‍वास सार्थ ठरविणार आहे. सभासदांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी योजना राबविणार आहे. -करसनदास ठक्कर, अध्यक्ष,पिंमको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

SCROLL FOR NEXT