नाशिक

घरकुल व जलतारा योजनांचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश

CD
ॲंकर NSK26H34583 जळगाव : नशिराबाद पीएचसीच्‍या भेटीदरम्‍यान माहिती घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर. –––– घरकुल व जलतारा योजनांच्‍या कामांना गती द्या (उपशीर्षक) करिश्मा नायर यांचा भुसावळ दौऱ्यात आढावा; नशिराबाद पीएचसीची पाहणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : घरकुल योजनांची अपूर्ण असलेल्‍या कामांना गती देऊन घरकुल लवकरात लवकर कशी पूर्ण होतील, याबाबत नियोजन करा. तसेच जलतारा उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर यांनी भुसावळ पंचायत समितीच्‍या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज (ता.५) भुसावळ तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण भागातील घरकुल योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित घरकुलांची कामे, जलतारा उपक्रमाची अंमलबजावणी तसेच इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चौकट नशिराबाद पीएचसीला भेट त्यानंतर नायर यांनी नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील स्वच्छता, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच आरोग्य विषयक विविध बाबींची पाहणी केली. आरोग्य केंद्रातील परिसर व रुग्णसेवेशी संबंधित व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासह रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT