नाशिक

नूतन मराठा महाविद्यालयात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शन

CD
नूतन मराठा महाविद्यालयात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शन तीन दिवस महारांगोळीचे आकर्षण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासासह शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने नूतन मराठा महाविद्यालयात १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. नूतन मराठा महाविद्यालय, विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख आणि डॉ. एस. एस. राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. १४) सकाळी साडेदहाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन अनिल पाटील अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी आणि जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चौकट विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्याचा आढावा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगावची स्थापना झाली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा कर्मवीरांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. हे प्रदर्शन १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन कर्मवीरांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT