नाशिक

कसारा ब्लॉकमुळे १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम

CD
कसारा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांना विलंब १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान इगतपुरीत नियमन; अनेक मेल-एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता.९ : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या जोडणीसह कसारा यार्डातील ‘अप’ यार्ड लाइनच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान इगतपुरी येथे किंवा त्यापूर्वी अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. परिणामी, काही गाड्या २० ते ४० मिनिटे उशिराने धावतील. या तीन दिवसांत इगतपुरी येथे किंवा त्यापूर्वी नियमन होणाऱ्या गाड्यांमध्ये गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१६६), हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित एक्स्प्रेस (१२१७२), हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट (१२८७०, १० ऑक्टोबर), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०८२), अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (११०५८), कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी (२२५१२), सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट (१२१०८), अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस तुलसी (२२१३०), साईनगर शिर्डी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत (२२२२४), हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली (१२८६०), गोमतीनगर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक (१२५३३), नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन (१७६१८) आणि बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी (११०७२) यांचा समावेश आहे. या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबरला अप गाड्यांनाही विलंब रविवारी, ११ ऑक्टोबरला धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (११०१२), पाटलिपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१४२), नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत (२०७०५), प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो (१२२९४), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०८०), छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०६०), आग्रा कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस लश्कर (१२१६२), बरेली-लोकमान्य टिळक टर्मिनस (१४३१४), हिंगोली डेक्कन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी (१२०७२), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (१५०१८) आणि पटना-वास्को-द-गामा एक्स्प्रेस (१२७४२) यांचे नियमन होणार आहे. या गाड्यांना ३५ ते ४० मिनिटांचा विलंब होऊ शकतो. डाउन गाड्याही २५ मिनिटे उशिराने १०, १२ व १३ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम, पनवेल-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सीतापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्हारशाह नंदीग्राम, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज वंदे भारत, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल कर्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड पंचवटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड राज्यराणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया विदर्भ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-फिरोजपूर पंजाब मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरंतो, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल अंत्योदय, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड उद्योगनगरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा दुरंतो, कोईम्बतूर-जबलपूर सुपरफास्ट विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेसला २० ते २५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली डेक्कन जनशताब्दी, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगलाद्वीप, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीब रथ, लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी, दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सहरसा विशेष यांसह अन्य डाउन गाड्याही २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT